पालघर (वाडा) - संततधार पावसाची जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आज दुपारी दीड वाजता दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कुर्झे धरणाचे ३ दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.
कुर्झे धरणातून १९४२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या धरणातील दरवाजे उघडल्याने वरोळी नदीकाठावरील आणि गुजरात राज्यातील उंबरगाव, संजन गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर सूर्या नदीवरील धामणीचे ५ दरवाजे ७० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सूर्या नदीत १७ हजार ४३४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे .