ETV Bharat / state

शाब्बास मुंबई पोलीस... पालघरच्या तरुणीचा मारेकरी विशाल सिंह याला गोरखपूरमध्ये पकडले - केंद्रीय गुन्हे शाखा मीरा भाईंदरवसई विरार

पालघर येथील तरूणी वर्षा गोयल हिच्या हत्येचा (Varsha Goyal Murder Case) आरोप असलेल्या राजकुंवर सिंह याला यूपी एसटीएफने गोरखपूर येथून (UP STF arrested from Gorakhpur) ताब्यात घेतले आहे. 11 ऑक्टोबर रोजी अदानी अपार्टमेंट मध्ये हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. महाराष्ट्र पोलीस आणि यूपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी राज कुंवर सिंह उर्फ विशाल सिंह (Raj Kunwar Singh alias Vishal Singh) याला ताब्यात घेतले आहे.

vishal singh
विशाल सिंग
author img

By

Published : Nov 18, 2021, 3:55 PM IST

Updated : Nov 18, 2021, 6:08 PM IST

लखनऊ - उत्तरप्रदेश येथील एसटीएफ (STF of Uttar Pradesh) आणि महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) यांनी पालघर येथील तरूणीची हत्या करून (Varsha Goyal Murder Case) फरार असलेला आरोपी राज कुंवर सिंह उर्फ विशाल सिंह (Raj Kunwar Singh alias Vishal Singh) याला संयुक्त कारवाईत गोरखपूर येथून ताब्यात घेतले आहे.

  • आरोपीला घेतले ताब्यात -

पालघरमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी यूपी पोलिसांशी त्याला ताब्यात घेण्यासाठी सहकार्य मागितले होते. त्यानंतर गोरखपुर एसटीएफने आपली शोध मोहिम सुरू केली होती. आणि गोरखपूर पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या पर्यटन कार्यालयाच्या जवळून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 400 रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

  • सोनहा येथील परसोहिया येथील निवासी -

ताब्यात घेतल्यानंतर एसटीएफने विशालला केंट पोलिसांना सोपविले. केंट पोलिसांकडून त्याचा ताबा महाराष्ट्र पोलिसांना दिला जाईल. राज कुंवर हा बस्ती जिल्ह्यातील सोनहा येथील परसोहिया या गावचा निवासी आहे. पालघरमधील गौरीपाडा जीवननगर येथील अदानी अपार्टमेंटमध्ये राहत होता.

  • अदानी अपार्टमेंटमध्ये केली होती हत्या -

पोलीस चौकशीत त्याने कबुल केले आहे, की ११ ऑक्टोबर रोजी त्याने अदानी अपार्टमेंटमध्ये वर्षा गोयलची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह लपविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर तो बाथरुममध्येच मृतदेह सोडून फरार झाला.

हेही वाचा - प्रियकराने फसवल्याने प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या, आरोपीस अटक

Last Updated : Nov 18, 2021, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.