ETV Bharat / state

पनवेलमध्ये भाजपची विजय संकल्प बाईक रॅली; 'कहो दिल से, मोदी फिरसे'च्या दिल्या घोषणा - india

पनवेलमध्ये हातात भाजपचा झेंडा घेऊन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हजारो तरुणांनी बाईक रॅली काढली. प्रत्येक बूथवरील ५ यूथ घेऊन या संख्येनुसार बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. तरुणाईचा उत्साह जल्लोष आणि देशप्रेमाच्या घोषणा आणि सोबत शिस्तीचे पालन करत आजची ही बाईक रॅली पार पडली.

पनवेल
author img

By

Published : Mar 3, 2019, 11:31 PM IST

पनवेल - भाजपतर्फे आज पनवेल विधानसभा मतदारसंघात विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी 'कहो दिल से, मोदी फिर से', 'फिर एक बार, मोदी सरकार' अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपतर्फे संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी विजय बाईक रॅली काढण्यात आली. पनवेलमध्येही आज सकाळी भाजप कार्यालयापासून शहरात बाईक रॅली काढण्यात आली.

पनवेल

भाजपतर्फे संपूर्ण देशभर विजय संकल्प बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. पनवेलमध्ये हातात भाजपचा झेंडा घेऊन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हजारो तरुणांनी बाईक रॅली काढली. प्रत्येक बूथवरील ५ यूथ घेऊन या संख्येनुसार बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. तरुणाईचा उत्साह जल्लोष आणि देशप्रेमाच्या घोषणा आणि सोबत शिस्तीचे पालन करत आजची ही बाईक रॅली पार पडली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात रॅलीला झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात केली. भाषणाला जोरदार प्रतिसाद देत तरुणाईने मोदी... मोदी...चा जयघोष केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कहो दिल से.. मोदी फिर से..., फिर एक बार मोदी सरकार, अशा घोषणा तरुणाईने देताच संपूर्ण पनवेल शहर दुमदुमून गेले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर स्वतः बाईकवर बसून या विजय संकल्प रॅलीमध्ये सहभागी झाले.

आमदार ठाकूर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावे म्हणून आजची ही विजय संकल्प बाईक रॅली होती. आजचा तरुणाईचा उत्साह पाहिला की पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होणार याबाबत आता कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास यावेळी आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.

undefined

Intro:पनवेल

"वंदे मातरम, भारत माता की जय" यासह "कहो दिल से...मोदी फिर से", "फिर एक बार मोदी सरकार" अशा घोषणांनी आज पनवेल विधानसभा मतदारसंघ दुमदुमून गेलं. निमित्त होतं ते भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प बाईक रॅलीचं... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी भाजपतर्फे संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी विजय बाईक रॅली काढण्यात आली पनवेलमध्ये सुद्धा आज सकाळी दहा वाजता भाजप कार्यालयापासून शहरात बाईक रॅली काढण्यात आली.

Body:भाजपतर्फे संपूर्ण देशभर विजय संकल्प बाईक रॅली आयोजित करण्यात आली असून पनवेल मध्ये देखील हातात भाजपचा झेंडा घेऊन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हजारो तरुणांनी बाईक रॅली काढली. प्रत्येक बूथ वरील पाच यूथ घेऊन या संख्येनुसार बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. तरुणाईचा उत्साह जल्लोष आणि देशप्रेमाच्या घोषणा आणि सोबत शिस्तीचे पालन करत आजची ही बाईक रॅली पार पडली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे बाईक रॅलीची एक तुकडी घेऊन स्वागत करण्यात आलं. तिथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रॅलीला झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात केली.

भाषणाला जोरदार प्रतिसाद देत तरुणाईने "मोदी... मोदी... मोदी..." चा जयघोष केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत "कहो दिल से.. मोदी फिर से...", "फिर एक बार मोदी सरकार" अशा घोषणा तरुणाईने देताच संपूर्ण पनवेल शहर दुमदुमून गेले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर स्वतः बाईकवर बसून या विजय संकल्प रॅली मध्ये सहभागी झाले.

Conclusion:यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावे म्हणून आजची ही विजय संकल्प बाईक रॅली होती. आजचा तरुणाईचा उत्साह पाहिला की पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होणार याबाबत आता कोणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास देखील यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
---------------

बातमीसाठी व्हिडिओ / बाईट एफटीपी करीत आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.