पालघर - वसईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कार समुद्रात वाहून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अतिउत्साही पर्यटक आपल्या कार, मोटरसायकल समुद्रकिनाऱ्यावर आणत असतात. त्यानंतर त्याकडे लक्ष नसल्याने ते वाहन समुद्रात वाहून जाण्याचे प्रकार घडत असतात. वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरही असाच प्रकार घडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर एक कार समुद्रात वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही वेळानंतर ट्रॅक्टरला टोचन करून कार पाण्याबाहेर काढण्यात आली. मात्र, अशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे अर्नाळा पोलिसांनी सांगितले.