वसई (पालघर) वसई, विरारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक निर्बंधांचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरताना आढळून येत होते. मात्र अशा नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी आता वसई, विरार महापालिकेकडून मंगळवारपासून आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे आज दिवसभर रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट
शहारात नागरिकांकडून वारंवार निर्बंधाचे उल्लंघन करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक फिरताना दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून अधिक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नव्या निर्बंधांनुसार सकाळी 7 ते 11 या वेळेतच आता अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. यामध्ये किराणा, दुध, बेकरी, भाजी मार्केट यांचा समावेश आहे. दरम्यान महापालिकेने घातलेल्या या कडक निर्बंधांमुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या लेकीने ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर केले सर, ठरली पहिली भारतीय महिला