वसई/विरार (पालघर) - कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वसई-विरार शहरात सोमवारी दिवसभरात नवीन तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १५ व्यक्ती कोरोनातून बरे झाले असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
वसई तालुक्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १५३ झाली आहे. यामध्ये कोरोनामुक्त एकूण रुग्ण ८० आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ असून उपचार घेत असलेले उर्वरित एकूण रुग्ण ६५ इतके आहेत.
नवीन रुग्णांचा तपशील
रुग्ण क्र. १५१- नालासोपारा पूर्वेकडील ३० वर्षीय पुरुष असून रुग्ण मुंबईमध्ये रुग्णालयातील सफाई कर्मचारी आहे. रुग्ण मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
रुग्ण क्र. १५२- विरार पश्चिमेकडील ५१ वर्षीय महिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह दुसऱ्या महिला रुग्णाच्या हायरिक्स संपर्कातील आहे. रुग्णास नालासोपारा पश्चिमेकडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
रुग्ण क्र. १५३- विरार पूर्वेकडील ३९ वर्षीय पुरुष आहे. रुग्ण मुंबई येथील कर्मचारी आहे. हा रुग्ण मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.