पालघर (वसई)- पर्यटनासाठी आलेले पर्यटक नदीला आलेल्या पूरामुळे उडकून पडले होते. कामान देवकुंडी गावातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून या पर्यटकांना वाचवले आहे. ग्रामस्थांनी रस्सीच्या साहाय्याने पुरातून या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले आहे.
वसई तालुक्यात सध्या जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. अशातच पर्यटनाची मजा लुटण्यासाठी वसई रानगाव येथून १५ पर्यटक रविवारी देवकुंडी परिसरात गेले होते. यात ४ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश होता. दुपारी अचानक देवकुंडी नदीला पूर आल्याने ७ जन हे नदीच्या पात्रात अडकले होते. गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोठ्या शर्तीने या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पर्यटनावर बंदी असताना प्रशासनाचे आदेश तोडून हे पर्यटक पर्यटनासाठी आले होते.