ETV Bharat / state

आगामी जनगणना ही जातिनिहाय व्हायला हवी - रामदास आठवले

जनगणना ही जातिनिहाय व्हावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

upcoming-census-should-be-caste-wise-said-ramdas-athavale-in-palghar
आगामी जनगणना ही जातिनिहाय व्हायला हवी - रामदास आठवले
author img

By

Published : Feb 21, 2021, 3:55 AM IST

Updated : Feb 21, 2021, 5:33 AM IST

पालघर - आगामी जनगणना ही जातिनिहाय व्हावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या टोल आणि डीझेल दरवाढबाबत सुरू असेल्या आंदोलनावरही टीका केली.

प्रतिक्रिया

जातिनिहाय जनगणना हवी -

ओबीसी वर्गाकडून आगामी 2021 ची जनगणना ही जातिनिहाय व्हावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीला आमचा पाठिंबा आहे. जातिनिहाय जनगणना व्हावी, असे आमचे मत आहे. जातिनिहाय जनगणनेनुसार कोणाला किती आरक्षण देता येईल हे कळेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. जातिनिहाय जनगणना ही तांत्रिकदृष्ट्या अडचणीची आहे, असेही ते म्हणाले.

शेतीकरिता जलसिंचन महत्त्वाचे -

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील विकासाच्यादृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला डहाणु-जव्हार-मार्ग-नाशिक हा रेल्वेमार्ग होणे गरजेचे आहे. त्यामुळे इथल्या ग्रामीण विकासाला हातभार लागेल.
तसेच येथील शेतकरी वर्गाला शेती सिंचनासाठी धरण बांधणे महत्वाचे आहे. या ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी हे पिके घेतील. तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी आता अध्यक्ष बनावे -

कॉंग्रेसकडून अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना शुटींग करुन देणार नाही, अशी धमकी देणे चुकीचे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. डिझेल दरवाढी संदर्भात कॉंग्रेसकडून आंदोलने केली जात आहेत. यावर बोलताना आठवले यांनी कॉंग्रेसच्या सत्ता काळात ही डिझेल दरवाढ व्हायची, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपद सोडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झालेत, तर राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा - स्वराज्य शिलेदारांच्या स्मृती, तरुणांनी केले ऐतिहासिक वीरगळींचे संवर्धन

Last Updated : Feb 21, 2021, 5:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.