पालघर : मनोर - पालघर रस्त्यावर मस्तान नाका परिसरात अज्ञात वाहन आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वारासह एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अधिक तपास मनोर पोलीस करत आहेत.
हेही वाचा - पालघरमध्ये जमिनीच्या वादातून वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला
एम. एच. 48 बी. के. 0965 या मोटारसायकलवरून मनोरहून मस्तान नाक्याकडे जात असताना ताकवहाळनजिक एका अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार महेश रमेश बरड (रा. खुटल) आणि विनोद सुरेश हाडल (रा.वाडाखडकोना) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक देऊन अज्ञात वाहन चालक पसार झाला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सायलेंट रिसॉर्टजवळ हेल्मेटधारक दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार