मुंबई - भाजप शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर आज मंगळवारी मातोश्रीवर पालघर जिल्ह्याची बैठक घेण्यात आली. यात जिल्ह्याबाबत संघटनात्मक चर्चा करण्यात आली. उमेदवारी मिळो ना मिळो पक्षासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्याचे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले.
या बैठकीत खासदार श्रीनिवास वनगा व पालघर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना भाजपच्या युती आधी शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा मागितली होती. युतीच्या घोषणेत शिवसेनेला भाजपने एक अधिकची जागा सोडली. त्यामुळे शिवसेनेची पालघर लोकसभा क्षेत्राची जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.