ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

author img

By

Published : Sep 11, 2019, 5:55 PM IST

वन खात्याने, भारतीय वन कायदा 1927 मध्ये सुचवललेल्या प्रस्तावित सुधारणांमुळे आदिवासींचे वनहक्क हिरावून घेतले जात आहेत, असा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. कष्टकरी संघटनेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पालघर रेल्वे स्थानकापासून सरू झालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पालघर - वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी, आदिवासी पाड्यांमध्ये नवीन गावठाण घोषित करण्यात यावे किंवा असलेले गावठाण क्षेत्र वाढविण्यात यावे आणि भारतीय वन कायद्यामध्ये प्रस्तावित सुधारणा रद्द करण्यात यावी आदी मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पालघर रेल्वे स्थानकापासून सरू झालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासींच्या झोपड्या हटवण्यात येत आहेत. तसेच, अनेकांना त्यासंदर्भात नोटीसदेखील देण्यात येत आहे. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून हजारो दावे प्रलंबित आहेत, असा आरोप आदिवासी बांधव करत आहेत.

हेही वाचा - पालघरातील जव्हारमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के

जव्हार विभागाने आदिवासींना त्यांच्या फॉरेस्ट प्लॉटवर बांधलेली घरे आणि झोपड्यात हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. वन खात्याने, भारतीय वन कायदा 1927 मध्ये सुचवललेल्या प्रस्तावित सुधारणांमुळे आदिवासींचे वनहक्क हिरावून घेतले जात आहेत. या सुधारणेमुळे जंगलाच्या खासगीकरणाचा मार्ग खुला करून राष्ट्रीय संपत्तीचे रुपांतर खाजगी नफ्यात करता येणे शक्य आहे, असा आरोप कष्टकरी संघटनेना करत आहे. वनविभागाच्या या धोरणाच्या निषेधार्थ कष्टकरी संघटनेने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनदेखील यावेळी दिले .

Intro:वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, भारतीय वन कायद्यामध्ये प्रस्तावित सुधारणा रद्द करा आदी मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकBody: वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा, भारतीय वन कायद्यामध्ये प्रस्तावित सुधारणा रद्द करा आदी मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नमित पाटील,
पालघर, दि.11/9/2019

   गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासींच्या झोपड्या व घरे तोडून त्यांना हटवण्यात येत आहेत तसेच त्यासंदर्भात नोटिस देण्यात येत आहेत. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून हजारो दावे व अपील अजूनही प्रलंबित आहेत याविरोधात तसेच केंद्र सरकारच्या भारतीय वन कायद्यामध्ये प्रस्तावित सुधारणा रद्द करावी या मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पालघर रेल्वे स्थानकापासून सरू झालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी महिला व बांधव सहभागी झाले.

     पालघर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींच्या वन हक्कांचे  उल्लंघन होत असून आदिवासींना त्यांच्या वनजमिनी वरून हटवले जात आहे. जव्हार विभागाने आदिवासींना त्यांच्या फॉरेस्ट प्लॉटवर बांधलेल्या घराणी झोपड्यात दोन हटवण्याचे मोहीम हाती घेतली, असून एप्रिल 2019 मध्ये अशाच प्रकारचे एक दर जेसीबी मशीनचा वापर करून तोडण्यात आले त्याप्रमाणेच कच्च्या झोपड्याही तोडण्यात आल्या. कोणत्याही आदिवासी पाड्यांमध्ये गावठाण क्षेत्र न न वाढवता आदिवासींची फॉरेस्ट प्लॉटवर घरी मोडणे हे अन्यायकारक असून आदिवासींच्या जगण्याचे हक्काचे उल्लंघन आहे. वन खात्याने, भारतीय वन कायदा 1927 मध्ये  सुचविललेल्या प्रस्तावित सुधारणामुळे आदिवासींचे वनहक्क यामुळे हिरावून जात आहेत. आधीपासूनच बलशाली असणाऱ्या वनखात्याच्या नोकरदारांना आणखी शक्ती मिळणार आहे. या सुधारणेमुळे जंगलाच्या खाजगीकरणाचा मार्ग खुला करून राष्ट्रीय संपत्तीचे रूपांतर खाजगी नफ्या करता येणे शक्य आहे. याच्या निषेधार्थ कष्टकरी संघटनेने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

1.फॉरेस्ट प्लॉटवरील आदिवासींच्या घरांची मोडतोड थांबविण्यात यावि
2. भारतीय वनहक्क कायद्यामध्ये सुचवलेल्या प्रस्तावित सुधारणा मागे घेण्यात याव्यात.
3.आदिवासी पाड्यांमध्ये नवीन गावठाण घोषित करण्यात यावे किंवा असलेले गावठाण क्षेत्र वाढविण्यात यावे.
4. वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि सर्व प्रलंबित दावे तसेच अपील मंजूर करण्यात यावे.
5. जिल्हा कन्व्हर्जन समिती वन संसाधन क्षेत्राच्या व्यवस्थापनामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरली असल्यामुळे या समितीची बैठक बोलविण्यात यावी.
आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Byte:-
1.मधुबाई धोडी- कष्टकरी संघटना
2.ब्रायन लोबो- कष्टकरी समघटना

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.