ETV Bharat / state

पालघर-देवगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणामध्ये दुकाने तुटणार; व्यापाऱ्यांचा विरोध

रस्त्याला लागून दुकाने आहेत. तसेच पार्किंगची सोय देखील नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नाहीतर अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

author img

By

Published : Jul 17, 2019, 9:32 PM IST

पालघर-देवगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला व्यापाऱ्यांचा विरोध

पालघर (वाडा) - पालघर-देवगाव या रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध केला जात आहे. या रस्त्याचे रुंदीकरण कमी करावे, असी मागणी व्यापारी असोसिएशन करत आहे.

पालघर-देवगाव राज्यमार्गाच्या रुंदीकरणाला व्यापाऱ्यांचा विरोध

पालघर-वाडा-देवगाव हा क्रमांक ३४ चा राज्य मार्ग वाडा शहरातून जातो. या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. तसेच दोनचाकी, चारचाकी वाहनांना मोठ्या कसरतीने वाहतूक करावी लागते. याच रस्त्याला लागून दुकाने आहेत. तसेच पार्कींगची सोय देखील नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नाहीतर अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जवळपास १५ मीटरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. तसेच वाडा शहरातून १२०० मीटरचे काँक्रीटीकरण होत आहे. मात्र, या रस्त्यावर ४०० मीटरपर्यंत अतिक्रमण असल्याची माहिती सार्वजनीक बांधकाम उपविभागाकडून देण्यात आली. तसेच १५ मीटरच्या रुंदीकरणामध्ये व्यापाऱ्यांचे दुकाने तुटणार आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, हे रुंदीकरण १५ मीटर न करता १२ मीटर करण्याची मागणी व्यापारी असोसिएशनचे सल्लागार संतोष पातकर यांनी केली आहे. यापूर्वी देखील व्यापारी वर्गाकडून तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा आणि नवनियुक्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदीकरणाबाबत निवेदने दिलेली होती.

Intro:रस्ते कामाला रुंदीकरणाचा खोडा,
पालघर -वाडा-देवगांव राज्यमार्ग

पालघर (वाडा) संतोष पाटील

पालघर -वाडा-देवगाव या हा रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असताना त्याच्या रस्ता रुंदीकरण कामाला व्यापारी वर्गाकडून विरोध होऊ लागला आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात आहे.
मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय वाडावासीयांसाठी कळीचा मुद्दा ठरत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण कमी करावे अशी मागणी वाडा व्यापारी असोशिएसनकडून होत आहे.त्यामुळे येथे रस्ते कामाला रूंदीकरणाचा खोडा तयार झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर -वाडा-देवगांव हा राज्य मार्ग क्रमांक 34 या रस्त्याचे काम सुरू केले आहे.हा रस्ता वाडा शहरातून जातोय.या रस्त्याचे रुंदीकरण 15 मीटर होत असुन 1200 मीटरचे वाडा शहरातून काँक्रीटीकरण होत आहे.या 400 मीटरापर्यंत अतिक्रमण असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांचे कार्यालयाकडून सांगितले जातेय.मात्र या 15 मीटरच्या रूंदीकरणाला वाडा शहरातील व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.
आमचा विकासाला विरोध नाही. पण येथे रूंदीकरणात येथील व्यापारी वर्गाची दुकाने तुटणार आहेत. त्यामुळे येथे त्यांच्या रोजगारावर आणि उदरनिर्वाहावर टाच येणार आहे.हे रुंदीकरण 12 मीटर करावे अशा मागणीची प्रतिक्रिया व्यापारी असोसिएशनचे सल्लागार संतोष पातकर ईटीव्ही शी बोलताना व्यक्त केली.
तर या वाडा शहरात रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे येथे नित्याचीच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असते.या रस्त्यावरुन दोन चारचाकी एसटी,ट्रक यासारखी वाहने येथून मोठ्या कसरतीने वाहचालकाला पास करावी लागतात.
त्याच रस्त्याला लागुनच दुकाने ना पार्कींग सोय ना वाहनतळाची सोय.अशा परिस्थितीत येथे येणारा ग्राहक रस्त्यावरच गाडी उभी करीत असतो.
त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत असते. अशातच एखादा भरधाव वाहनाने अपघात होण्याची भितीची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यानच्या काळात व्यापारी वर्गाकडून तत्कालीन पालकमंत्री विष्णु सवरा आणि नवनियुक्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रूंदीकरणाबाबत निवेदने दिले आहे.
रस्त्याच्या कामाला आता रस्ता रुंदीकरणाचा खोडा बनत चालला आहे.

Body: video _1 to 1 santosh patkar wada association
with a p2c

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.