ETV Bharat / state

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू, बाप-लेकासह आणखी एकाचा समावेश

नालासोपारा येथे एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी तलावात उतरला होता. तो पाण्यात बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी इतर दोघे पाण्यात उतरले. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

nalasopara
nalasopara
author img

By

Published : May 23, 2020, 10:10 AM IST

वसई (पालघर) - मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावात घडली आहे.

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांचा तलावात बुडून मृत्यू, नालासोपारा निळेमोरे गावातील घटना

निळेमोरे गावातील आदिवासी पाड्यातील तलावात शालू शिरवाड हा पस्तीस वर्षीय व्यक्ती मासे पकडण्यासाठी उतरला होता. मात्र, पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाला. तो दिसेनासा झाल्याने त्याला वाचविण्यासाठी त्याच्या २ मुलांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पैकी एक मुलगाही बुडाला. तर दुसरा मुलगा पाण्याबाहेर आला. मात्र, बुडणाऱ्या मुलाच्या मित्र देखील त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला, परंतु तोदेखील बुडून मृत्यू पावला. अशा प्रकारे बाप लेक आणि अन्य एकाचा या तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबतची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचे शोधकार्य सुरू केले. संध्याकाळी उशिरापर्यंत तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

लॉकडाऊनमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी मासे पकडताना झालेल्या तिघांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.