वाडा (पालघर) - पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तीन नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे. गुरुवारी (दि.14 मे) तीन वाजण्याच्या सुमारास हे अहवाल आले.
आज आढळलेल्या तिन कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. त्यापैकी 33 वर्षीय पुरुष हा वाडा येथील रहिवासी असून उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. 22 वर्षीय महिला वाडा येथील रहिवासी असून रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. तर 12 वर्षीय मुलीचा पनवेल येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे करोना चाचणी केली असता तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 38 सापडले आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध चालू आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच या रुग्णांना पालघर मधील टिमा येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यांनी दिली.
हेही वाचा - पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले तीन कोरोनाग्रस्त