ETV Bharat / state

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक - Palghar remdesivir news

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय झाल्या आहेत. अशाच एका टोळीचा भांडाफोड नालासोपारा येथील पोलिसांनी केला आहे. या टोळीतील तीन जणांना अटक करून रेमडेसिवर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समिउल्ला फारूख शेख (वय वर्ष 21), मोहम्मद इरशाद हनान (वय वर्ष 26), मोहम्मद तरबेज रशीद शेख (वय वर्ष 21) असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

Palghar
Palghar
author img

By

Published : Apr 21, 2021, 4:52 PM IST

पालघर / नालासोपारा : काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा वसई विरार नालासोपारामध्ये सुरू आहे. नातेवाईक आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत. याची संधी साधून काहीजण इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. अशा टोळ्या मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात सक्रीय झाल्या आहेत. अशाच एका टोळीचा भांडाफोड नालासोपारा येथील पोलिसांनी केला आहे. या टोळीतील तीन जणांना अटक करून रेमडेसिवर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समिउल्ला फारूख शेख (वय वर्ष 21), मोहम्मद इरशाद हनान (वय वर्ष 26), मोहम्मद तरबेज रशीद शेख (वय वर्ष 21) असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

हे तिघे मीरारोड येथे राहणारे असून डिलिव्हरी बॉय, कपड्याचा व्यवसाय व संगणक पुरवठा करण्याचे काम ते करत होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागत आहे. वाढत्या मागणी प्रमाणे त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना इंजेक्शनची गरज असल्यामुळे हे 3 हजार 900 रुपयेचे इंजेक्शन तीस ते पस्तीस हजार रुपयांना नागरिकांना विकत होते. या प्रकाराची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच दिवसांपासून सापळा रचला. तडजोडीअंती प्रत्येकी एक इंजेक्शन तेरा हजार पाचशे रुपयाला विकत घेण्याचे ठरविले. रात्री दहाच्या सुमारास मिरारोडमध्ये जाऊन तिन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून तीन इंजेक्शन्स ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींनी विक्रीसाठी इंजेक्शन कुठून आणले? तसेच त्यांच्यासोबत आणखी इतर साथीदार आहेत का? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.