पालघर : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाध्ये रोजगार मेळावा देखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यापुर्वी देखील असे कार्यक्रम काही जिल्ह्यात झाले आहे. राज्यांमध्ये 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना या अभियानाच्या माध्यमातून पोहचविल्या आहेत. सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत योजना पोहचणार नाही तोपर्यंत सरकार काम करीत राहिल सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षाभरापुर्वी स्थापन झाले या सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्तीक लाभ होईल असा निर्णय या शासनाने घेतला नाही शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून हे शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाअंतर्गत देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
जनतेचे जिवनमानात बदल : पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालयाचे भूमिपूजन, जलजिवन मिशनचे ई-भूमिपूजन करण्यात आले. सर्व सामान्याच्या जिवनामध्ये बदल घडविणे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले आहेत. सर्व सामान्याच्या जिवनामध्ये सकारात्मक अमुलाग्र बदल घडविणे हाच उद्देश शासनाचा आहे. सर्व सामान्य नागरीकांसाठी या शासनाने जवळपास चारशे निर्णय घेतले आहेत. अनेक लोकाभिमूख प्रकल्प होताहेत उद्योग वाढीसाठी अनेक निर्णय घेतले आहे. त्यासाठी रेड कार्पेट देण्यात आला आहे. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावले पाहिजे. इतर सर्व सामान्य जनतेचे जिवनमानात देखील बदल घडविण्याचा उद्देश शासनाचा आहे. बांद्रा-वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे पुर्वी जे प्रकल्प राबविण्यात आले नव्हते ते सर्व प्रकल्प या शासनाने चालू केले आहेत.
गुंतवणकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर : मुंबईसह महाराष्ट्राचे सर्व पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरु आहेत. मागील 11 महिन्यामध्ये परदेशी थेट गुंतवणकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. प्रथमच मागच्या मंत्रीमंडळ बैठकी मध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये मच्छीमार बांधवासाठी तरतूद करण्यात आली. पंचामृत अर्थसंकल्पामध्ये सर्व समावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
1 हजार 850 तरुणांना रोजगार : जिल्ह्यातील पोलीस विभागाने देखील रोजगार मेळावा घेतला दहा हजार तरुणांनी सहभाग नोंदविला होता. या रोजगार मेळाव्यात 1 हजार 850 तरुणांना रोजगार मिळाला आहे. पोलीस दलाने कायदा सुव्यवस्था राखण्या बरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. लेक लाडकी लखपती या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्या बरोबर एक लाख रुपयाचे अनुदान जाहिर करण्यात आले. शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार 6 हजार अनुदान देते तर राज्य शासन 6 हजार असे एकुण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बाधवांना देण्यात येत आहे. मागील शासनाच्या काळात 2014 ते 2019 या कालावधीमधील लोकाभिमुख प्रकल्प बंद करण्यात आले होते. त्या सर्व योजना पुन्हा सुरु करण्यात आल्या त्याचा फायदा जनतेला होत आहे. केंद्र शासनाचा भक्कम पाठींबा राज्य शासनाला असल्यामुळे आपण सर्व महत्वकांशी प्रकल्प पुढे नेत आहोत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर : जागतिक स्तरावरील सर्वेनुसार लोकप्रिय नेत्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 84 टक्के लोकांनी पसंती देऊन त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. या देशाचा सन्मान जागतिक स्तरावर राखण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी केले आहे. या देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. यांचे सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांना जाते. पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी यांनी सुचविलेले प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएची व्याप्ती देखील सपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात सर्वात प्रशस्त इमारत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लांभार्थ्यांना विविध वस्तंचे वाटप करण्यात आले.
तळागळापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहचविणार : फडणवीस
पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून एका छताखाली सर्व योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतू पालघर जिल्ह्याने दोन लाखाच्या वरती लाभार्थ्यांना लाभ देऊन हे अभियान यशस्वी केले आहे. सामान्यासाठी काम करणारे हे सरकार सामान्यांच्या जिवनात गुणात्मक बदलासाठी काम करत आहे. जो पर्यंत योजनांचा लाभ तळागळातील जनतेपर्यंत पोहचणार नाही. तोपर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ‘नमो शेतकरी’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात पिक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला.
जिल्हा रुग्णालयाचे भूमीपुजन : आज पालघरमध्ये जिल्हा रुग्णालयाचे भूमीपुजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्याला 5 हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात रुग्णालय उभी केली जात आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनअंतर्गत दिड लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जात होते. परंतु आता 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. त्यामुळे कोणताही गरजु लाभार्थी उपचाराविना रहाणार नाही. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर : प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी 5 लाख घरे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. याची संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची सुचना देखील यावेळी त्यांनी केली. केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर ओबीसी बांधवांसाठी देखील पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत ओबीसी बांधवांसाठी 10 लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत : महिला करिता 50% एस.टी. सवलत देण्यात आली. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे म्हणून 1 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. निलक्रांतीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मासेमारी करिता शितपेट्या, आधुनिक गाड्या उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आदीवासी मुलांना शाळेत असतांनाच त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखिल यावेळी फडणवीस म्हणाले.
‘शासन आपल्या दारी’ पालघर जिल्हा कार्याक्रमाचा शुभारंभ कोळगाव, पालघर येथे आयोजीत करण्यात अला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत हाते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूर, श्रीनिवास वनगा, क्षितीज ठाकूर, विवेक पंडित, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी जिल्हाधिकारी डॉ. कीरण महाजन, पालघरच्या नगरध्यक्षा उज्वला काळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनीधी आणि लाभार्थी उपस्थित होते.