पालघर - जिल्ह्यातील मनोर वाडा भिवंडी या महामार्गावरील रस्ता डागडुजी आणि नवीन नूतनीकरण केलेल्या रस्त्यांवर डांबरीकरणाचे थरावर थर वाढले आहेत. परिणामी तानसा, वैतरणा आणि पिंजाळ नदीच्या पुलाच्या सरंक्षक कठड्यांची उंची कमी झाली आहे. या ठिकणी कठड्यांना धडक बसून दुचाकीस्वार मृत्यूमुखी पडले असून काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे येथील पुलाच्या संरक्षक कठड्यांची उंची सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढवावी, अशी मागणी वाहनचालक करत आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी 40 आमदारांची उपस्थिती
पालघर जिल्ह्यातील मनोर -वाडा -भिवंडी हा महामार्ग ६५ किमी अंतराचा असून या रस्त्याचा दुरावस्थे बरोबरच जुन्या जीर्ण पुलांचे संरक्षक कठडेही धोकादायक बनले आहेत. १९५२ साली वाडा तालुक्यातील तानसा पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्याच दरम्यान वैतरणा आणि पिंजाळ नदीवरील पुलाचे कामही करण्यात आले. पावसाळ्यात नदी पुलाचे सरंक्षक कठडे हे पुराच्या पाण्यात दिसतही नाहीत. संरक्षक कठड्यांची आजवर रस्ते बांधकामात आणि डागडुजीत उंची कमी होऊ लागली आहे. वर्षानुवर्षे रस्ते खडी भराव आणि रस्त्यांच्या थराने रस्ते आणि सरंक्षक कठडे दीड दोन फुट तर कुठे काही फुटांवर दिसत असतात. त्यात ते ही भंगलेल्या अवस्थेत दिसत असतात. पुलावर पडलेले खड्ड्यात एखादी दुचाकी उडाली किंवा कठड्याला धडकली तर वाहचालक हा नदी पात्रात कोसळत असतो.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री रवीशंकर यांनी माफी मागावी...'त्या' वक्तव्यावरुन संभाजीराजे छत्रपती कडाडले
वैतरणा नदी पुलावर खरीवली गावातील दुचाकीस्वार नदीपात्रात पडून गंभीर जखमी झाला होता. तर काही वर्षांपूर्वी तानसा नदीपात्रात पुलावरून पडून दुचाकीवस्वाराचा मृत्यू झाला होता. संरक्षक कठड्यांची कमी उंची आणि दुरावस्थेमुळे येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करवा लागतो.