पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट (एन. के. फार्मा) या कंपनीत रिअॅक्टरमध्ये शनिवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास स्फोटात सात कामगार ठार झाले. त्यानंतर अग्निशमन दलाला व एनडीआरएफच्या पथकाला शोध कार्य व मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर कालपर्यंत एनडीआरएफच्या पथकाने 14 तास शोधमोहीम हाती घेऊन सहा मृतदेह बाहेर काढले आहेत.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
एनडीआरएफचे इन्स्पेक्टर बिपीन सिंग यांनी सांगिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या दोन मृतदेहांपैकी एक मृतदेह रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तसेच दुपारच्या सुमारास खुशी नावाच्या चिमुकलीचा मृतदेह असे एकूण आठ मृतदेह या पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जखमींनादेखील सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. तब्बल 14 तास चाललेले हे बचावकार्य व शोध मोहिम एनडीआरएफच्या एकूण 35 कर्मचारी-अधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक दुर्घटनेत दोन कामगार महिलांचा मृत्यू तर चिमुकल्या जखमी