ETV Bharat / state

वसईत एका मनोरूग्ण महिलेचा संशयास्पद मृत्यू

वसईत एका मनोरुग्ण महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

mentally ill woman death
वसईत एका मनोरूग्ण महिलेचा संशयास्पद मृत्यू
author img

By

Published : Jun 13, 2020, 2:50 PM IST

वसई (पालघर) - वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत गेल्या अडीच महिन्यांच्या लाॅकडाऊन काळात अनाथ, बेसहारा तसेच मनोरूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पालिकेने अतिरिक्त अकरा ठिकाणी तात्पुरत्या निवारा केंद्राची उभारणी केली होती, ती देखील बंद करण्यात आली आहे. निवारा केंद्रात नेण्यात न आल्यामुळे बुधवारी संध्याकाळी वसईत एका 60 वर्षीय मनोरूग्ण महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेच्या दुर्लक्षपणा व भूकेमूळे या मनोरूग्ण महिलेचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.

नालासोपारा पश्चिम वाॅर्ड क्रमांक 56 नाळा येथे मे महिन्यात चार मनोरूग्ण आढळून आले होते. त्यात दोन पुरूष व दोन महिला मनोरूग्णांचा समावेश होता. स्थानिक नागरिकांनी पालिकेला कळविल्यानंतर त्यातील दोन पुरूष मनोरूग्णांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र दोन महिलांना निवारा केंद्रात नेण्यात आले नव्हते. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही पालिकेने त्यांना नेले नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिपक म्हात्रे यांनी दिली. त्यानंतर परिसरातील लोक त्या महिलांना अन्न व कपडे देत होते. या मनोरूग्णांना कोरोना महामारीची माहिती नसल्यामुळे ते तोंडाला मास्क, रूमाल न बांधताच दिवसभर गावा-गावात फिरत असत. त्यामुळे ते कोरोना संक्रमित होण्याचा धोका होता. त्याचप्रमाणे महिला मनोरूग्णांची मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे त्यांच्यासोबत वाईट घडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे या महिलांना निवारा केंद्रात दाखल करण्याची मागणी केली, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली. यादरम्यान 10 जून रोजी यातील एक 60 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह नाळा गावाच्या हद्दीबाहेर निर्मनुष्य ठिकाणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू भुकेने झाला की इतर आजाराने याच्या तपासासाठी नालासोपारा पोलिसांनी नमूने जेजे रूग्णालयात पाठवले आहेत.

mentally ill woman death
वसईत एका मनोरूग्ण महिलेचा संशयास्पद मृत्यू

मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात नालासोपारा पश्चिम शुर्पारक नगर, सी प्रभाग समिती कार्यालय, नवघर-माणिकपूर, नालासोपारा पश्चिम, वसई गाव, वालिव, विरार, नालासोपारा पूर्व, विरार पूर्व व नालासोपारा जिल्हा परिषद शाळा, जिवदानीनगर, विरार पूर्व याठिकाणी ही तात्पूरती निवारा केंद्र बनविण्यात आली होती. या निवारा केंद्रात विस्थापित झालेले किंवा उपासमार होत असलेले कामगार व मजूर यांना भोजन, निवारा व वैद्यकीय मदत देण्यात येत होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तेरा निवारा केंद्रात तब्बल 688 लोकांना तात्पूरते ठेवण्यात आले होते. दहा दिवसानंतर त्यात घट होऊन 285 लोक आश्रयाला होते. मात्र, 20 मे नंतर पालिकेने उर्वरीत 11 निवारा बंद करण्याचा निर्णय घेतला. सद्या पापडी येथे 13 व विराटनगर येथे 58 जणांना निवारा केंद्रात ठेवले असून वालिव व वालाईपाडा येथे नव्याने दोन निवारा केंद्र बनविण्यात येणार असल्याची माहिती निवारा केंद्र शहर व्यवस्थापक विभा जाधव यांनी दिली.

अहमदाबाद येथील एका महिलेच्या आईचा मार्च महिन्यात मृत्यू झाला. त्यानंतर ती तिच्या चार लहान बहिणींना घेऊन मावशीकडे आश्रयाला गेली. मात्र, मावशीच्या नवऱ्याची वाईट नजर तिच्यावर पडल्याने मावशीने तिला घराबाहेर काढत दुसरीकडे जाण्याचा सल्ला दिला. ती महिला बहिणींना घेऊन विरार स्थानकात पोहोचली. तेथून लोकलने नालासोपारा येथे आली आणि लॉकडाऊन घोषित झाले. हातात पैसे नव्हते आणि राहायला निवारा नसल्याने तिने भीक मागायला सुरुवात केली. शहरातील लोकांनी हाकलल्यावर फिरत नाळा गावातील एका तलावाकाठी आश्रयाला आली. ही महिला महिला वेडी नसल्याचे समजल्यावर स्थानिकांनी जेवण व कपडे दिले. महिला असल्याने तिच्यासोबत काही अघटीत होऊ नये म्हणून तिला निवारा केंद्रात नेण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पालिकेकडे केली. या महिलेची मानसिक स्थिती बदलत असून तिच्यावर वेळीच उपचार न झाल्यास ती मनोरूग्ण बनेल, अशी भिती वर्तवण्यात येत होती. महानगरपालिकेने गुरूवारी संध्याकाळी या महिलेला विराटनगर येथील पालिका निवारा केंद्रात दाखल केले.

दरम्यान, वसई विरार शहरातील निराधार व मनोरूग्णांना पालिकेच्या दोन निवारा केंद्रात ठेवण्यात येते. तेथे भोजन, निवास व वैद्यकीय सेवा देण्यात येते. या निवारा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गंगाथरन डी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.