पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मागील वर्षभरापासून भूकंपाचे सत्र असून काल (शुक्रवार) मध्यरात्री एकापाठोपाठ एक असे तीन धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून चिंचले, आंबोली, सासवांड, धुंदलवाडी येथे नुकसानग्रस्त घरांची डहाणू उपविभागीय अधिकारी असीमा मित्तल यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी केली. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी सुरू असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी असल्याची सांगितले आहे.
बोलताना उपविभागीय अधिकारी पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात काल भूकंपाचे धक्के बसले. रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी बसलेला 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का हा आजवर बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यापैकी सर्वाधिक तीव्रतेचा आहे. चिंचले, धानीवरी, उर्से, कासा या भागात या भूकंपाची तीव्रता अधिक जाणवली असून या भूकंपामुळे जिल्ह्यातील 50 किलोमीटरचा परिसर हादरला. वारंवार बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे हजारो घरांना तडे गेले आहेत. मध्यरात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे चिंचले येथील दत्तू पडवळे यांच्या घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरिही घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भूकंपाच्या धक्क्यामुळे डहाणू तलासरी परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून दिली जाणारी नुकसान भरपाई ही नाममात्र असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकसान भरपाई अधिक मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे डहाणूच्या उपविभागीय अधिकारी असीमा मित्तल यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - असेही शिक्षक...मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा