पालघर - शहापूर येथे एका मल्टीनॅशनल हॉस्पिटलचा भूमीपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई, अर्नाळा, वाडा, जव्हार, पालघर, डहाणू या बस आगारातील गाड्या आरक्षित केल्या. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल झाले.
हेही वाचा - ठाण्याच्या सिग्नल शाळेतील मुले जाणार 'इस्रो'च्या भेटीला
याच गाड्यांच्या ताफ्यामुळे वाडा-भिवंडी महामार्गावर वाहतूक कोंडी तयार झाली. महामार्गावर एकाच मार्गिकेवरून विरुद्ध दिशेने गाड्यांची ये-जा दिसत होती. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती.