वसई - श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ( Shraddha Walkar Murder Case ) नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्यात आता श्रद्धाच्या ओठाला पिअरसिंग ( Shraddha lip piercing ) करणाऱ्या तरुणाची प्रतिक्रिया समोर आली आहे. श्रद्धाने तिच्या ओठाला केलेले पिअरसिंग ( lip piercing ) हे वसईतील एका आर्टिस्टकडून करून घेतले होते. जेव्हा पिअरसिंग करण्यासाठी आली होती तेव्हा तीच्यासोबत आफताब ( Aftab ) होता अशी माहिती आर्टिस्टने दिली आहे.
अडीज हजार रुपये मोजून केले पिअरसिंग - तिने दोन ते अडीज हजार रुपये मोजून पिअरसिंग केले होते. तिचे हे पेमेंट आफताब ने केले होते. आफताब तेव्हाही स्वतःच्याच अटीट्युडमध्ये होता. आफताबने केलेले पेमेनेट हे ऑनलाईन पद्धतीने केले होते. मात्र, पेमेंट करताच काही न बोलता आफताब दुकानाबाहेर निघून गेला होता हे, दुकानदाराला चुकीचे वाटले होते.