ETV Bharat / state

पालघर : डहाणूत शाळेची भिंत कोसळली, विद्यार्थी बचावले - school wall collapsed Dahanu

डहाणू तालुक्यातील पळे येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आहे. यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रात्रीच्या सुमारास ही भिंत पडल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही किंवा जीवित हानी झालेली नाही.

school wall collapsed in pale of Dahanu taluka
डहाणूत शाळेची भिंत कोसळली
author img

By

Published : Jul 7, 2022, 12:06 PM IST

पालघर - डहाणूत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील पळे येथील जिल्हा परिषद ( Zilla Parishad School wall collapsed in pale ) शाळेची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने रात्रीच्या सुमारास ही भिंत पडल्याने ( school wall collapsed Dahanu taluka ) कोणतीही दुर्घटना न घडता यातून विद्यार्थी बचावले आहेत.

हेही वाचा - explosions at a factory in Tarapur : बोईसर तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण आग

डहाणू तालुक्यातील पळे बोरीपाडा येथे इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, एकूण १६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काल रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक या शाळेची पश्चिम बाजूची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. काल दिवसभर नेहमीप्रमाणे शाळा सुरू होती व संध्याकाळी विद्यार्थी घरी परतले होते.

या भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून त्यातच रात्रीच्या सुमारास शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली. हीच घटना जर दिवसा वर्ग सुरू असताना घडली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा या जीर्ण झाल्या असून दुरुस्ती अभावी धोकादायक बनल्या आहेत. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.

सध्या शालेय शिक्षण चालवीण्यासाठी वर्गखोल्या उपलब्ध आहेत. परंतु, दुर्गम भागातील पावसाचे प्रमाण पाहता पुन्हा एकदा नैसर्गिक संकट येऊ शकते. म्हणून कोसळलेल्या भिंतीबरोबरच अत्याधुनीक सोई सुविधांनी युक्त असलेली नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडे पाठवुरावा करणार असल्याचे डेहणे पळे ग्रांमस्थानी सांगितले.

हेही वाचा - Bogus doctor exposed : पालघर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.