ETV Bharat / state

Youth Drowned in Sea : धक्कादायक! वसईच्या कळंब समुद्रात दोन तरूण बुडाले; एकाला वाचण्यात स्थानिकांना यश दुसऱ्याचा मृत्यू - साहिल बावकर युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

पालघर जिल्ह्यातील वसईच्या कळंब समुद्रात दोन तरूण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाला वाचण्यात स्थानिकांना यश आले आहे तर एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Youth Drowned in Sea
तरूणाचा समुद्रात बुडून मृत्यू
author img

By

Published : Mar 20, 2023, 4:18 PM IST

वसई (पालघर) : निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमीच समुद्र किनाऱ्यावर विसावा घेण्यासाठी जातात. पण समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि दुर्देवाने पाण्यात बुडाल्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना वसईतील कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर घडल्याचे समोर आले आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या दोन तरूण बुडालेल्याची घटना घडली आहे‌. त्यातील एकाला स्थानिक मच्छिमारांनी वाचवले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दुसऱ्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.

एकाचा मृत्यू दुसरा बचावला : नालासोपारा तुळींज येथील राहणारा साहिल बावकर २१ वर्षीय युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या तरूणाचा मृतदेह आज बाहेर काढण्यात स्थानिक मच्छिमार व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. साहिल संजय बावकर काल रविवारी ९.३० च्या सुमारास आपल्या मित्रा सोबत कळंब समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आला असता वसईतील कळंब समुद्राच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत खामकर नावाचा तरुण बुडत असताना त्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

मृतदेह सापडला : तरूण बुडाल्याच्या घटनेनंतर काल रात्री पासून त्याचा शोध जीवरक्षक शोध घेत होते. मात्र तो सापडला नव्हता आज सकाळी कळंब येथील रमेश किणी, अभिजित किणी यांना समुद्रात जाळ्याला अडकलेली मृतदेह दिसताच लहान बोटीच्या मदतीने भुईगांव समुद्र किनारी आणून पोलिसांच्या ताब्यात दिली. पालिकेचे जीवरक्षक जनार्दन मेहेर, चारुदत मेहेर, अमोल मेहेर कळंब येथील तट रक्षक रमेश किणी, अभिजित किणी हे उपस्थित होते. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गोदावरीत बुडून चार मृत्यू : छत्रपती संभाजी नगरमधून दि. 11 मार्च रोजी तरूणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. छत्रपती संभाजीनगर, पुणे महामार्गालगत कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील काही तरुण पाणी आणण्यासाठी कायगाव टोका येथे आले होते. गोदावरी नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. गोदीवरी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये चौघांमध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), अक्षय भागीनाथ गोरे (वय 20) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय 22) यांचा समावेश होता. हे चौघही वैजापूर तालुक्यातील पालखेड गावचे रहिवासी होते.

हेही वाचा : Four Youths Drowned Godavari : नदीवर पाणी आणणे बेतले जीवावर; गोदावरीत बुडून चार तरुणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.