ETV Bharat / state

बोईसरमध्ये कारची काच फोडून 18 लाख रुपयांची बॅग लंपास

author img

By

Published : Jan 20, 2021, 2:57 PM IST

Updated : Jan 20, 2021, 7:00 PM IST

बोईसर येथील यशवंत सृष्टी भागातील ठाकूर गॅलेक्सी सोसायटी परिसरात असलेल्या रजिस्ट्रेशन ऑफिससमोर सोमवारी दुपारच्या सुमारास योगेश संखे यांनी इनोव्हा कार उभी केली. ते कामासाठी ऑफिसमध्ये गेले.

कारची काच फोडून चोरी
कारची काच फोडून चोरी

पालघर- बोईसरमध्ये भरदिवसा चोरट्यांनी कारची काच फोडून कारमधील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरटे कारमधील तब्बल 18 लाख रुपयांची भरलेली बॅग घेऊन पसार झाले आहेत.

बोईसर येथील यशवंत सृष्टी भागातील ठाकूर गॅलक्सी सोसायटी परिसरात असलेल्या रजिस्ट्रेशन ऑफिससमोर सोमवारी दुपारच्या सुमारास योगेश संखे यांनी इनोव्हा कार उभी केली. ते कामासाठी ऑफिसमध्ये गेले. मात्र, त्यांनी पैशाने भरलेली बॅग गाडीतच ठेवली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी संखे यांच्या कारची काच फोडली. कारमधील 18 लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. ऑफिसमधून कार जवळ परत येताच योगेश संखे यांना कारची काच कोणीतरी फोडल्याचे निदर्शनास आले. तसेच कारमधील पैशांनी भरलेली बॅगदेखील तेथे नव्हती.

कारची काच फोडून 18 लाख रुपयांची बॅग लंपास

हेही वाचा-ठाणे : वारीमाता ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा, ३ किलो सोने चोरीला

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल:-
कारमधून पैसे चोरी झाल्याचे लक्षात येताच योगेश संखे यांनी बोईसर पोलीस ठाणे गाठले. चोरीबाबत बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बोईसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा-एमआयडीसी चोरी प्रकरणी, सुपरवायझरसह टेम्पो चालकाला अटक

Last Updated : Jan 20, 2021, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.