ETV Bharat / state

विकासकाच्या निष्काळजीपणामुळे नायगाव पूर्वेतील रस्ता खचला, इमारती कोसळण्याची शक्यता

रस्ता खचल्याने या परिसरातील 24 माळ्यांच्या इमारतींना धोका उद्बवला आहे. त्यामुळे येथील रहिवासी प्रचंड तणावात आहेत. विकासकाने एका वर्षात 24 माळ्यांच्या 14 इमारती बांधल्या आहेत. या इमारतींजवळ सेप्टीक टँक बांधण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता विकासकाने मोठा खड्डा खोदण्यास सुरुवात केली आहे.

builder
विकासकाच्या निष्काळीपणामुळे नायगाव पूर्वेतील रस्ता खचला, इमारती कोसळण्याची शक्यता
author img

By

Published : Feb 26, 2020, 8:26 AM IST

Updated : Feb 26, 2020, 10:13 AM IST

पालघर - नायगाव पूर्वेतील ग्लोबल एरिना संकुलात नव्याने विकसित होणाऱ्या भव्य टॉवर्सच्या खोदकामामुळे संकुलात जाणारा शंभर फूट रस्ता अचानक खचल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेदरम्यान शाळकरी मुलांची एक बस रस्त्यावर होती. मात्र स्थानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे जीवितहानी टळली.

विकासकाच्या निष्काळजीपणामुळे नायगाव पूर्वेतील रस्ता खचला, इमारती कोसळण्याची शक्यता

रस्ता खचल्याने या परिसरातील 24 माळ्यांच्या इमारतींना धोका उद्बवला आहे. त्यामूळे येथील रहिवासी प्रचंड तणावात आहेत. विकासकाने एका वर्षात 24 माळ्यांच्या 14 इमारती बांधल्या आहेत. या इमारतींजवळ सेप्टीक टँक बांधण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता विकासकाने मोठा खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे. मंगळवारी सकाळी या परिसरातील रहिवासी मॉर्निंग वॉकला जात असताना या खड्ड्याला लागून असलेला मुख्य रस्ता खचत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर सुरक्षिततेसाठी हा रस्ता नागरिकांनी बंद केला.

हेही वाचा - 'देशात 'भारत माता की जय' म्हणणारा राहील; वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाईची वेळ'

एवढा मोठा प्रकार घडल्यानंतरही महापालिकेचा एकही संबंधित अधिकारी किंवा स्थानिक नगरसेवक न आल्यामुळे नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. या घटनेमुळे येथील इमारतींचा पाया कमकुवत झाला असून त्या कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Feb 26, 2020, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.