ETV Bharat / state

आता शासकीय रुग्णालयातूनच मिळणार रेमडेसिव्हीर - पालकमंत्री भुजबळ

ब्रेक द चेन' मुळे पॉझिटिव्हीटीचा आलेख ३० टक्क्यांनी कमी झाला. ग्रामीण भाग आणि मालेगावात १२ ते १९ टक्के कोरोनाचा आलेख खालावला आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 11, 2021, 12:44 PM IST

Updated : Apr 11, 2021, 1:02 PM IST

नाशिक - मागील दोन दिवसात जिल्ह्याला आठ हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळाले असले, तरी मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, प्रत्येक करोना रुग्णाला इंजेक्शनची आवश्यकता नाही. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यापुढे मेडिकलमधून रेमडिसिव्हर मिळणार नाही. महापालिका, जिल्हा रुग्णालय यांच्याकडेच रेमडिसिव्हर इंजेक्शनचा साठा दिला जाईल. अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ज्या रुग्णालयांना इंजेक्शन हवे असेल त्यांनी शासकीय रुग्णालयांकडून ते प्राप्त करुन घ्यावे जेणेकरुन रेमडेसिव्हीर तुटवडा व काळाबाजार होणार नसल्याचेही भुजबळ म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ

पॉझिटिव्हीटीचा आलेख ३० टक्क्यांनी कमी

डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय रेमडेसिव्हिरचे वितरण करण्यात येऊ नये. रेमडिसिव्हीर प्रत्येक रुग्णाला आवश्यक नाही. डॉक्टरांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. जिल्ह्यात व्हेंटिलेटर सध्या पुरेसे आहेत. आवश्यकता असेल तर अजून मागवण्यात येतील. 'ब्रेक द चेन' मुळे पॉझिटिव्हीटीचा आलेख ३० टक्क्यांनी कमी झाला. ग्रामीण भाग आणि मालेगावात १२ ते १९ टक्के कोरोनाचा आलेख खालावला. कोरोना संकट हा सगळ्यांचा एकत्रीत लढा असल्याचेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष

ग्रामीण भागात ३१ ठिकाणी नवीन कोविड सेंटर

खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवावे आणि साठा वाढवावा. गरज नसताना, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेऊ नये असे आवाहन भुजबळ यानी केले आहे. ग्रामीण भागात ३१ ठिकाणी नवीन कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, ड्युरा सिलेंडर मिळवायचे प्रयत्न आहे. १५८ मेट्रिक टन पैकी ९६ मेट्रिक टन पुरवठा आपल्याकडे शिल्लक आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचे एक टँकर व २७ ड्युरा सिलेंडर पैकी ७ सिलेंडर प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील कोविडचे उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा होणारा वापर लक्षात घेता, खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा अखंडीतपणे पुरवठा होण्यासाठी डॉ. किशोर श्रीवास यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे .सिन्नरच्या दोन कंपन्या आपण ताब्यात घेऊन उत्पादन करतोय असे भुजबळ यांनी सांगितले.

बेड उपलब्धतेचा फलक प्रत्येक कोविड रुग्णालयात लावणे

बेड उपलब्धतेचा फलक प्रत्येक कोविड रुग्णालयात लावण्यात यावा. नर्सिंग महाविद्यालय, एसएमबीटी व एमव्हीपी महाविद्यालयातून नर्सेसची सेवा घेण्याबाबत नियोजन करण्यात यावेत. खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा वाढवावा आणि रुग्णांच्या आवश्यतेनुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. त्याप्रमाणे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने खाजगी डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी पूढे यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा - LIVE UPDATES : राज्यात वीकेंड लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस, जाणून घ्या ताज्या घडामोडी...

Last Updated : Apr 11, 2021, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.