ETV Bharat / state

रवींद्र चव्हाण पालघरचे नवे पालकमंत्री - पालकमंत्री

रवींद्र चव्हाण यांची नाळ काही काळात पालघर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे.

पालघरच्या पालकमंत्रीपदी रवींद्र चव्हाण
author img

By

Published : Jul 6, 2019, 7:52 AM IST

पालघर - राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले होते. परिणामी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या महिन्याभरापासून रिक्त होते.

रवींद्र चव्हाण यांची नाळ काही काळात पालघर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे. त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून काही काळच शिल्लक असला तरी या कालावधीत ते जिल्ह्याची बरीच विकासकामे मार्गी लावतील, येथील आदिवासी बहुल भागालाही ते पालकमंत्री म्हणून न्याय देतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

लोकसभा पोटनिवडणुक, पालघर नगरपरिषद निवडणूक तसेच अलीकडील लोकसभा निवडणूक व जिल्हा भाजपच्या विविध कार्यक्रमात चव्हाणांनी लक्ष घातले आहे. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली. जिल्ह्याच्या प्रभारी संपर्क पदाची जबाबदारीही चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Intro:पालघरच्या पालकमंत्रीपदी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची वर्णीBody: पालघरच्या पालकमंत्रीपदी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची वर्णी

नमित पाटील,
पालघर, दि. 5/7/2019

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे असलेले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले. परिणामी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या महिन्याभरापासून रिक्त होते. मुख्यमंत्र्यांनी आज पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नेमणूक करून जिल्हावासीयांना दिलासा दिला.

लोकसभा पोटनिवडणुक, पालघर नगरपरिषद निवडणूक तसेच अलीकडील लोकसभा निवडणूक व जिल्हा भाजपच्या विविध कार्यक्रमात चव्हाण गेली काही वर्षे लक्ष घालत असून या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. जिल्ह्याच्या प्रभारी संपर्क पदाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी स्वतः रवींद्र चव्हाण यांना दिलेली आहे.

रवींद्र चव्हाण यांची नाळ काही काळात पालघर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे. त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून काही काळच शिल्लक असला तरी या कालावधीत ते जिल्ह्याची बरीच विकासकामे मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे येथील आदिवासी बहुल भागालाही ते पालकमंत्री म्हणून न्याय देतील अशी अपेक्षा आहे. आता जिल्ह्याच्या नियोजन समिती पासून ते जिल्ह्यात कार्यरत विविध शासनाच्या समित्यांवर पालकमंत्री म्हणून अध्यक्ष राहात असताना विविध विकास कामे त्यांच्या हातून घडणे अपेक्षित आहे मात्र पालकमंत्री म्हणून धुरा स्वीकारल्यानंतर ते जिल्ह्याला कशा पद्धतीने न्याय देतील हा येणारा काळच ठरवेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.