पालघर : आंबा काजू बगायतदारांचे ही या मध्ये मोठे नुकसान झाले आहे. तसेच या जोरदार पावसाच्या माऱ्याने छोट्या आकाराचे आंबे झाडावरून गळून पडले असुन काही भागातील मोहर ही गळून गेला आहे. अचानक विजेच्या गडगडाट वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे आंबा बागायतदाराचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसापासुन तालुक्यात तापमानात चढ-उतार होत आहे. रात्रीच्या दरम्यान विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसाची सुरुवात झाली 45 मिनिट सतत पाऊस झाल्याने नंतर पाऊस थांबला असला तरी आंबा बागायतदार, वीट भट्टी मालकांचे नुकसान झाले.
ढगाळ वातावरणाचा फटका बसणार : शेतकऱ्यानी लावलेल्या रब्बी पिक भाजीपाला तसेच उडीदाचे पिक, तुरीचे कडधान्यांबरोबरच काकडी, कलिंगड, चवळी, वांगी, मिरची,गवार, टाॅमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक,आदी या पिकांना ही अवकाळी पाऊसाचा तसेच ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. तरी नूकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी केली आहे. काही दिवसापासून तापमानात चढ-उतार होत आहे. काल रात्री अचानक अडीच ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. 45 मिनिट सतत पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबला पण शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह पालघर परिसारत पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यानुसार काल नंदूरबार आणि बुलढाणामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याचबरोबर इतरही जिल्ह्यातही पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आल आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.