पालघर - जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पालघरमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. पालघर, सफाळे, माहीम, सातपाटी, केळवे भागात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या काही तासांत पालघर व आसपासच्या परिसरात काही ठिकाणी तुरळक व काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा - निवृत्तीनंतर पार्थिव पटेल करणार 'हे' काम