पालघर - महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकी असून हे फार काळ चालणार नाही. त्याची सुरुवात अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्यापासून झाली असून लवकरच सरकार पडेल, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी पालघरमध्ये केली.
हेही वाचा - 'आता लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर'
पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
हेही वाचा - 'खाते वाटपावरून अब्दुल सत्तार यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही'
सरकारमध्ये खाते वाटपावरुन मोठा गोंधळ असून यांना स्वतःच्या फायद्याची खाती हवी आहेत. त्यामुळे या सरकारला जनतेचा नाही तर स्वतःचा फायदा कसा होईल, याचा विचार आहे. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला जनादेश दिला होता. मात्र, सेनेने बेइमानी करून हे सरकार स्थापन केले. त्यामुळे जनादेश अजूनही भाजपच्या पाठीशी आहे, हे दाखवून देण्यात पालघरमधील जनता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मागे उभी राहील, असा विश्वासही यावेळी प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.