वसई : 'माझ्या जीवाला आफताबपासून धोका ( Shraddha was a threat from Aftab ) आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने 23 नोव्हेंबर 2020 रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली ( Police investigated Shraddha application ) होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली ( Police investigated Shraddha Case ) होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.
आफताब श्रद्धाला मारहाण करायचा - नोव्हेंबर 2020 रोजी आफताबला बेदम मारहाण केली होती. यामुळे ती तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. या मारहाणीनंतर 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा ने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असे या तक्रारीत स्पष्ट लिहिले होते. हा अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तकार असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे
पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे - श्रद्धा ने अर्ज दिल्यानंतर आम्ही 26 दिवस त्याची चौकशी करत होतो. दोन वेळा आमचे अधिकारी श्रद्धा आणि आफताबच्या घरी जाऊन आले होते. दोघांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र श्रद्धा आणि आफताबा यांच्यामध्ये समझोता झाल्याने हा अर्ज 26 दिवसांनी निकाली काढण्यात आला अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली. श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.