ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन, 50 नायजेरियन नागरिक ताब्यात - combing operation against nigeria people

सोमवारी नालासोपाऱ्याच्या प्रगती नगरमध्ये तुळींज पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह कोंबिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये पासपोर्ट, व्हिसा अशी ओळखपत्र न बाळगणाऱ्या व भाडे तत्वाबाबत कुठलाही करार न करता राहणाऱ्या तब्बल 50 हुन अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलिसांनी या नायजेरियन्सकडून मुद्देमालही ताब्यात घेतला आहे.

नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन,
author img

By

Published : Nov 19, 2019, 8:10 AM IST

पालघर - जिल्ह्यातील नालासोपारा शहरात नायजेरीयन नागरिकांच्या गुन्ह्याच्या संख्येत वाढ होत आहे. परदेशी नागरिकांना जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही या गुन्ह्यांवर अंकुश येत नसल्याने सोमवारी पालघर पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह नालासोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये कोंबिंग ऑपरेशची मोहीम राबविली. या मोहिमेत 50 हुन अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, नालासोपाऱ्यात पहिल्यांदाच राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे शहरात नायजेरियन नागरिक व त्यांच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

पालघर जिल्ह्यात काहीच दिवसांपूर्वीच पालघर पोलिसांनी नायजेरियन व बांगलादेशी नागरिकांसाठी कलम 144 (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू केले होते. तसेच स्थानिकांना नायजेरियन्सना भाडेतत्वावर घर देत असाल तर त्यासंबंधित कराराची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी होत होती. मात्र, गुन्हेगारी काही थांबत नव्हती. तसेच पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

हेही वाचा - विषारी सापाच्या दंशाने एकाचा मृत्यू

अखेर सोमवारी नालासोपाऱ्याच्या प्रगती नगरमध्ये तुळींज पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह कोंबिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये पासपोर्ट, व्हिसा अशी ओळखपत्र न बाळगणाऱ्या व भाडे तत्वाबाबत कुठलाही करार न करता राहणाऱ्या तब्बल 50 हुन अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या नायजेरियन्सकडून मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिली नाही. मात्र, ताब्यात असलेल्या या नागरिकांची आता चौकशी केली जाणार आहे. यामध्ये त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये चोरीचे सत्र सुरूच... एका रात्रीत दोन दुकाने फोडली

नायजेरियन नागरिकांकडून शहरात अमली पदार्थ बाळगल्याच्या व तस्करीच्या घटना वाढल्या होत्या. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच नायजेरियन तरुणाच्या खून प्रकरणामुळे स्थानिक व नायजेरियन्समध्ये हाणामारीची घटना घडली. हे प्रकरण खूप गाजले होते. त्यामुळे आता नालासोपारा पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर शहरात नायजेरियन गुन्ह्यांच्या घटनांवर अंकुश बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - पालघरमध्ये चक्रीवादळाचा मत्स्यव्यवसायाला फटका; मच्छी महागाईने खवय्यांचे हाल

Intro:स्लग- नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन
Body:स्लग- नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

पालघर / नालासोपारा - नालासोपारा शहरात नायजेरीयन नागरिकांच्या गुन्ह्याचा वाढता आकडा लक्षात घेत जिल्ह्यात परदेशी नागरिकांना मनाई आदेश असतानाही या गुन्ह्यांवर अंकुश येत नसल्याने आज पालघर पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह नालासोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये कोबिंग ऑपरेशची मोहीम राबविली. ज्यात 50 हुन अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. नालासोपाऱ्यात पहिल्यांदाच राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे शहरात नायजेरियन नागरिक व त्यांच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघर जिल्ह्यात काहीच दिवसांपूर्वीच पालघर पोलिसांनी नायजेरियन व बाग्लादेशी नागरिकांसाठी कलम 144 (१)(२) अन्वये मनाई आदेश लागु केले होते. तसेच स्थानिकांना नायजेरियन्सना भाडेतत्वावर घर देत असाल तर त्यासंबंधित कराराची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी होत होती मात्र गुन्हेगारी काही थांबत नव्हती. तसेच पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
आज अखेर नालासोपाऱ्याच्या प्रगती नगरमध्ये तुळींज पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह कोबिंग ऑपरेशन राबवत, पासपोर्ट, विझा अशी ओळखपत्र न बाळगणाऱ्या व भाडे तत्वाबाबत कुठलाही करार न करता राहणाऱ्या तब्बल 50 हुन अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या नायजेरियन्स कडून मुद्देमालहि ताब्यात घेतला. पोलिसांनी या संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिली नाही आहे. ताब्यात असलेल्या या नागरिकांची आता चौकशी केली जाणार आहे, यामध्ये त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
नायजेरियन नागरिकांकडून शहरात अंमली पदार्थ बाळगल्याच्या व तस्करीच्या घटना वाढल्या होत्या. त्याचबरोबर काहीच दिवसांपूर्वी नायजेरियन तरुणाच्या खून प्रकरणामुळे स्थानिक व नायजेरियन्समध्ये हाणामारीची घटना घडली. हे प्रकरण खूप गाजलं होते. त्यामुळे आता नालासोपारा पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर शहरात नायजेरियन गुन्ह्यांच्या घटनांवर अंकुश बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.