ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त ; चार नायजेरिअन नागरिकांना अटक - nigerians in connection of drugs in Nala Sopara

बॉलिवूडसह मुंबईमध्ये गाजलेल्या 'ड्रग्ज कनेक्श'ननंतर नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना प्रगती नगर परिसरातून अटक केली आहे.

नायजेरियन नागरिकांना अटक
नायजेरियन नागरिकांना अटक
author img

By

Published : Nov 2, 2020, 10:58 PM IST

Updated : Nov 3, 2020, 12:28 AM IST

पालघर /नालासोपारा - बॉलिवूडसह मुंबईमध्ये गाजलेल्या 'ड्रग्ज कनेक्शन'नंतर नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना प्रगती नगर परिसरातून अटक केली आहे. प्रगती नगर हा नायजेरियन नागरिकांचा हॉटस्पॉट असून त्यांचे अवैध धंदे पुन्हा सक्रिय झाले आहेत.

नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त

दोन पथकांनी केली कारवाई

प्रगती नगर परिसरात नायजेरियन व्यक्ती कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस पाटील यांना मिळाली होती. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, सुखराम गडाख यांच्या दोन पथके तयार करून प्रगती नगर परिसरात सकाळपासून सापळा रचला होता.

सापळा रचून आरोपींना अटक

येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून असताना दुपारच्या सुमारास सद्गुरु अपार्टमेंटजवळ चार नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी चारही नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दीड कोटींचे साडेसातशे ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आगू ओसीता (28), उर्जी फिलिप्स (30), ओगोना चुकवेनेने (29) आणि ख्रिस अजाह चुकवेनेका (30) असे पकडलेल्या चार नायजेरियन आरोपींची नावे आहे. तुळींज पोलीस ठाण्यात चारही आरोपी विरोधात एनडीपीएसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Nov 3, 2020, 12:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.