पालघर - चिंचारे येथे राहणाऱ्या लडका देवजी वावरे यांचा रुग्णालयात नेताना मोटरसायकलवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉक डाउन असल्याने त्यांच्या दोन मुलांना त्यांना मोटारसायकलवरूनच नेण्याची वेळ आली.
पालघर जिल्ह्यातील मूळचे चिंचारे येथील असलेले लडका देवजी वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र, त्यानंतर आज पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे कोणत्याही खासगी वाहन न मिळाल्यामुळे दोन्ही मुलांनी तातडीने आपल्या वडिलांना मोटारसायकलवरच रुग्णालयात जेऊन जाण्यासाठी निघाले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच अर्ध्या रस्त्यातच लडका देवजी वावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे.