ETV Bharat / state

पनवेलमध्ये 'टोईंग'ची कारवाई वादाच्या भोवऱ्यात - Parking towing

पनवेलमधील नागरिकरणासह वाहनांची संख्येत वाढ होऊन पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्याकडेला पदपथावर व 'नो पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केली जातात. नो पार्किंगमधील ही वाहतूक शाखेकडून टो करून उचलली जातात. हा प्रकार काही ठिकाणीच सुरू असून काही अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून काही वाहनांवर चांगलीच मेहेरबानी होत असताना दिसत आहे.

panvel
'टोईंग'ची कारवाई वादाच्या भोवऱ्यात
author img

By

Published : Dec 9, 2019, 11:41 PM IST

पनवेल - पनवेलमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पनवेलमधील वाहतूक शाखेचे हे प्रयत्न फक्त काही ठिकाणापुरतेच दिसून येत आहे. काही ठराविक ठिकाणी बेकायदेशिरपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई न करता दंडही आकारला जात नाही. त्यामुळे एकप्रकारे वाहतूक विभागाचा महसूल बुडवला जात असल्याचा प्रकार पनवेल शहरात सुरू झाला आहे.

'टोईंग'ची कारवाई वादाच्या भोवऱ्यात

पनवेलमधील नागरिकरणासह वाहनांची संख्याही वाढत असल्याने शहरातील वाहतूक नियमन बिघडत चालले आहे. पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्याकडेला पदपथावर व 'नो पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केली जातात. हा प्रश्‍न भेडसावत असताना वाहतूक शाखेकडून वाहनांची 'उचलगिरी' सुरूच असते. वाहतूक शाखा आणि ठाणे महापालिकेचे 'टो' करणारे कर्मचारी वाहने उचलून नेतात. ही कारवाई फक्त ठराविक ठिकाणीच होते, तर अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून काही वाहनांवर चांगलीच मेहेरबानी होत असताना दिसत आहे.

हेही वाचा - इमारतीच्या छतावरून खाली पडून एकाचा मृत्यू; पालघरमधील घटना

नो पार्किंगच्या नावाने दुचाकीस्वाराकडून २०० ते ३०० रुपये घेतले जातात. विशेष म्हणजे त्याची कोणतीच पावती दिली जात नाही. चौकीच्या बाहेरच एका मुलाकडे ही वसूली करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तो एका साध्या वहीत पैशांची नोंद करतो आणि त्यानंतर गाडी सोडली जाते. दिवसाला १०० ते २०० गाडया 'टो' करून उचलल्या जात असून यातून लाखोंची कमाई होते. मात्र, हे पैसे शासनाकडे न जाता टोईंग व्हॅनवरील मुले, टोईंग व्हॅनवरील कर्मचारी यांच्यात वाटप होतात. तर, काही रक्कम वरिष्ठ पातळीवर पोहचवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. टोईंग पथकाच्या या दुजाभाव कारवाईमुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेची ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हेही वाचा - निसर्गरम्य जव्हार घनकचऱ्याच्या कचाट्यात, दुर्गंधीमुळे जनता त्रस्त

Intro:सोबत व्हिडीओ जोडले आहेत.

पनवेल

पनवेलमधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पनवेलमधीक वाहतूक शाखेचे हे प्रयत्न फक्त काही ठिकाणापुरतीच दिसून येत आहे. काही ठराविक ठिकाणी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई न करता दंडही आकारला जात नाही, अशा प्रकारे वाहतूक विभागाचा महसूल बुडवला जात असल्याचा प्रकार पनवेल शहरात सुरू झाला आहे. Body:पनवेल मधील नागरीकरणासह वाहनांची संख्याही वाढत असल्याने पनवेल शहरातील वाहतूक नियमन बिघडत चालले आहे. पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने रस्त्याकडेला पदपथावर व 'नो पार्किंग' क्षेत्रात वाहने उभी केली जातात. हा प्रश्‍न भेडसावत असताना वाहतूक शाखेकडून वाहनांची 'उचलेगिरी' सुरूच असते. वाहतूक शाखा आणि ठाणे महापालिकेचे 'टो' करणारे कर्मचारी वाहने उचलून नेतात. पण ही कारवाई फक्त ठराविक ठिकाणीच होते. अनेक ठिकाणी तर वाहतूक शाखेची चांगलीच मेहेरबानी झळकताना दिसतेय.
Conclusion:
नो पार्किंगच्या नावाने 200 ते 300 रुपये दुचाकीस्वाराकडून घेतले जातात. विशेष म्हणजे त्याची कोणतीही पावती दिली जात नाही.चौकीच्या बाहेरच एका मुलाकडे ही वसूली करण्याची जबाबदारी दिलेली आहे. एका साध्या वहीत तो पैशांची नोंद करतो त्यानंतर गाडी सोडली जाते. दिवसाला 100 ते 200 गाडया उचलल्या जातात. यातून लाखोंची कमाई होते. मात्र, हे पैसे शासनाकडे न जाता टोईंग व्हॅनवरील मुले, टोईंग व्हॅनवरील कर्मचारी यांच्यात वाटप होवून काही रक्कम वरिष्ठ पातळीवर पोहचवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. टोईंग पथकाच्या या दुजाभाव कारवाईमुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुक शाखेची ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.