ETV Bharat / state

Palghar zilla parishad : पालघर जिल्हा परिषदेची लढाई ही दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल-भास्कर जाधव - democracy against oppression

पालघर जिल्हा परिषदेची लढाई ( Battle of Palghar Zilla Parishad ) ही दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल. वसई शिवसेनेच्यावतीने नालासोपारा पूर्व-तुळींज शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Bhaskar Rao Jadhav
प्रवक्ते भास्करराव जाधव
author img

By

Published : Nov 13, 2022, 2:10 PM IST

पालघर : पालघर जिल्हा परिषदेची लढाई ( Battle of Palghar Zilla Parishad ) ही दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल. ज्यांना कुणाला धमक्या, बळजबरी किंवा गुन्हे दाखल करायचे ते करू द्या. वेळप्रसंगी या दडपशाही विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा एल्गार महाराष्ट्र राज्याचे कामगार ( Workers of Elgar Maharashtra State ) व विशेष सहाय्य मंत्री ( Minister of Special Assistance ), शिवसेना नेते आणि प्रवक्ते भास्करराव जाधव ( Shiv Sena leader spokesperson Bhaskar Rao Jadhav ) यांनी दिला.

शिवसेनेच्या सदस्यांवर दबाव : वसई शिवसेनेच्यावतीने नालासोपारा पूर्व-तुळींज शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी पालघर जिल्हा परिषदेच्या १६ नोव्हेंबर रोजी असलेल्या निवडणुकी अनुषंगाने सुरू असलेल्या दडपशाहीवर त्यांनी विरोकांना खडेबोल सुनावले. या निवडणुकीकरता शिवसेनेच्या सदस्यांवर दबाव आणला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आमिषे दाखवली जात आहेत, अशी माहिती मला मिळाली असल्याची माहिती जाधव यांनी या वेळी दिली.

प्रवक्ते भास्करराव जाधव

भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिला इशारा : शिवसेनेच्या काही महिला सदस्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. त्यांच्या हॉटेलवर गुटखा टाकून हॉटेल बंद पडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या पेट्रोल पंपवर महसूल अधिकाऱ्यांना पाठवून पंप सील करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यातील महिला गरोदर आहेत. त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट न घडो. मला मिळालेली माहिती खोटी ठरो, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. ज्या सदस्यांना त्यांच्या सोबत राहू द्या; त्यांच्यावर उगाच दबाव आणू नका. ही लढाई दडपशाही विरुद्ध लोकशाहीची असेल. वेळप्रसंगी या दडपशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

भास्कर जाधव यांच्याकडून कौतुकाची थाप : नालासोपारा आणि वसई परिसरात माझ्या गुहागर मतदार संघातील अनेक रहिवाशी राहतात. सातत्याने ते मला वसई-विरार शहरात येण्यासाठी आग्रह करत होते. आजचा हा मेळावा त्यांच्यासाठीच होता. त्यांच्या आग्रहाखातरच मी आज या ठिकाणी आलो. पण जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या एका निर्णयाने मला त्यांच्यात राजकीय प्रगल्भता दिसली.

पक्ष संघटन व पक्ष वाढ लवकरच होईल : पंकज देशमुख यांनी मला सांगितले, साहेब तुम्ही वसई विरार शहरात येणार असाल तर आपले स्वागत शिवसेनेच्या माध्यमातूनच होईल. त्यानुसार त्यांनी मेळाव्याचीही जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मला त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे कौतुक आहे. माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण व विद्यमान जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांना अपेक्षित पक्ष संघटन व पक्ष वाढ लवकरच होईल, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख व सहकाऱ्यांना या प्रसंगी आश्वासित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.