पालघर - पालघर-वाडा-देवगाव या राज्यमार्गाचे वाडा शहरामध्ये रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. मात्र, या रुंदीकरणात शहरातील अतिक्रमनामध्ये असलेल्या घरांवर आणि दुकानांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी व्यापारी करत आहेत.
हेही वाचा -दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे
राज्यमार्गाच्या 15 मीटर रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. रस्ता रुंदीकरणातील अतिक्रमणामध्ये असलेल्या टपऱ्या, घरे, रस्त्याच्या दुतर्फा बसणारे भाजीवाले, मच्छी, फळविक्रेते आणि रिक्षा स्थानकावरून हद्दपार होणार आहेत. रस्त्याच्याकडेला असणाऱ्या गटारीचे खोदकाम करून ती गटारे युद्धपातळीवर बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. यावेळी नागरीक समीर म्हात्रे म्हणाले, "पुर्णत: बाधीत असणाऱ्या व्यापारीवर्गाचे पुनर्वसन संबधीत शासकीय यंत्रनेने करायला हवेत."
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : राज्य विधिमंडळात 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर