ETV Bharat / state

पालघर हत्याकांड : आंदोलनाच्या तयारीतल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - पालघर हत्याकांड न्यूज

भाजप नेते आमदार राम कदम यांनी आज पालघर येथील गडचिंचले येथे जन आक्रोश पद यात्रा काढण्याचे जाहीर केले होते. राम कदम यांच्यासोबत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेल्या पालघर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पालघर
पालघर
author img

By

Published : Nov 18, 2020, 6:02 PM IST

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला 211 दिवस झाले. तरीही याप्रकरणी न्याय मिळाला नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करत भाजप नेते आमदार राम कदमांनी आज पालघर येथील गडचिंचले येथे जन आक्रोश पदयात्रा काढण्याचे जाहीर केले होते. या पदयात्रेनंतर उपोषणाला बसण्याचाही राम कदम यांनी इशारा दिला होता. यात्रेला परवानगी नसल्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राम कदमांना घाटकोपरहून ताब्यात घेतले. त्यानंतर राम कदम सोबत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेल्या पालघर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात -

राम कदम यांच्यासोबत गडचिंचले येथे जाऊन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेले पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे, सुजित पाटील, सुशील औसरकर, संतोष गिंभळ, हर्षद पाटील या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथून ताब्यात घेतले.

जन आक्रोश पद यात्रा काढण्याच्या तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण -

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केली आहेत.

हेही वाचा - पालघर हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडे देण्यासाठी आंदोलन; राम कदमांना ताब्यात घेऊन सुटका..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.