पालघर - जिल्हा प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा जनसुनावणी विरोधात मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्र आक्रमक झाले आहेत. जनसुनावणी सुरू असलेल्या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे.
पालघरमधील दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात जनसुनावणी घेण्यात येत असून जनसुनावणीच्या ठिकाणी स्थानिक मच्छीमार व भूमिपुत्रांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांचा विरोध दाबण्यासाठी हे जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा - कांद्रेभुरे : 'विद्यार्थीच माझा गुरू' संकल्पनातून प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न
हेही वाचा - आम्हाला भयमुक्त करा; भूकंप प्रवण क्षेत्रातील पालघरवासीयांची शासनाकडे मागणी