Iपालघर - डहाणू तालुक्यातील नागझरी येथे भूकंपाच्या धक्क्याने घर पडून मृत्यू झालेल्या रिषा मेघवाले यांच्या कुटूंबीयांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ 4 लाखांची मदत घोषित केली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
डहाणू भूकंपातील मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत सुपूर्द आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यात भूकंपाचे चार धक्के बसले. पहाटे १ वाजताच्या सुमारास ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला होता. या भूकंपाच्या धक्क्यामुळे डहाणू तालुक्यातील नागझरी-बोंडपाडा येथील रिषा मेघवाले ( वय ५५ वर्षे) यांचा घर अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, भाजप आमदार पास्कल धनारे, राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर तसेच सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली.