ETV Bharat / state

पालघर मतदारसंघ : निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, ७२ हजार नवमतदार बजावणार हक्क

पालघर मतदारसंघात एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ८९ हजार, महिला मतदार ८ लाख ९६ हजार १८६ व तृतीयपंथी मतदार १११ आहेत.

author img

By

Published : Apr 28, 2019, 5:01 PM IST

निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे

पालघर - पालघर लोकसभेच्या मतदारसंघासाठी उद्या २९ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

पालघर मतदारसंघात एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ८९ हजार, महिला मतदार ८ लाख ९६ हजार १८६ व तृतीयपंथी मतदार १११ आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे

पालघर लोकसभा मतदारसंघात मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. १ जानेवारी २०१९ नंतर ७२ हजार ३१४ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारसंघात एकूण २१७७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ग्रामीण भागात १ हजार १९२ तर शहरी भागात ९८५ मतदान केंद्र आहेत.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या
डहाणू- २ लाख ६९ हजार ९८८
विक्रमगड- २ लाख ६४ हजार १३२
पालघर- २ लाख ७१ हजार १६७
बोईसर- २ लाख ९७ हजार ९१५
नालासोपारा - ४ लाख ८७ हजार ५६
वसई- २ लाख ९४ हजार ५३५

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र
डहाणू ३२७, विक्रमगड- ३४८, पालघर- ३२२, बोईसर- ३५३, नालासोपारा- ४८९, वसई- ३८८

पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे एकूण ६ मतदान केंद्र ही सखी मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्रांवर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी महिला असतील. १४ मतदान केंद्र हे संवेदनशील असून यापैकी ९ मतदान केंद्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघात, ४ बोईसर आणि १ डहाणू मतदारसंघात आहे. या मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक आणि स्वतंत्र व्हिडिओग्राफर नेमण्यात आले आहेत. तसेच तेथे केंद्रीय पोलीस दल ठेवण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १२ हजार ७२ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत राहणार आहेत. ३ हजार ८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेचे २३० अधिकारी, ३ हजार ८८५ कर्मचारी आणि होमगार्ड तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी मतदारांना केले आहे.

Intro: पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जास्तीत जास्त नागरिकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा : निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांचे आवाहनBody: पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जास्तीत जास्त नागरिकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा : निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांचे आवाहन

नमित पाटील,
पालघर, दि.28/4/2019

पालघर लोकसभेच्या मतदारसंघासाठी उद्या 29 एप्रिल रोजी, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

पालघर मतदारसंघात एकूण 18 लाख 85 हजार 297 मतदार असून यामध्ये पुरुष 9 लाख 89 हजार, महिला 8 लाख 96 हजार 186 व तृतीयपंथी 111 मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या:-
डहाणू- 2 लाख 69 हजार 988
विक्रमगड- 2 लाख 64 हजार 132
पालघर- 2 लाख 71 हजार 167
बोईसर- 2 लाख 97 हजार 915
नालासोपारा- 4 लाख 87 हजार 56
वसई- 2 लाख 94 हजार 535.

पालघर लोकसभा मतदार संघात मतदार नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला असून 1 जानेवारी 2019 नंतर 72 हजार 314 नवीन मतदारांची नोंद झाली असून ते प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात एकूण 2177 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून यापैकी ग्रामीण भागात 1192 तर शहरी भागात 985 मतदान केंद्र आहेत.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्र :-
डहाणू 327, विक्रमगड- 348, पालघर- 322, बोईसर- 353, नालासोपारा- 489, वसई- 388

पालघर लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे एकूण 6 मतदान केंद्र ही सखी मतदान केंद्र असणार आहेत. सदर मतदान केंद्रांवर सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी महिला असतील. 14 मतदान केंद्र संवेदनशील असून यापैकी 9 मतदान केंद्र नालासोपारा विधानसभा मतदारसंघात, 4 बोईसर आणि 1 डहाणू मतदारसंघात आहे . सदर मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक आणि स्वतंत्र व्हिडीओग्राफर नेमण्यात आले आहेत. तसेच तेथे केंद्रीय पोलीस दल ठेवण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 12072 अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत राहणार असून 3083 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलिस यंत्रणेचे 230 अधिकारी, 3885 कर्मचारी आणि होमगार्डस् तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या प्रत्येकी दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

जास्तीत जास्त नागरिकांनी घरा बाहेर पडून मतदान करावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी मतदारांना केले आहे.

बाईट - मराठी, हिंदी Both
डॉ . प्रशांत नारनवरे - निवडणूक निर्णय अधिकारीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.