ETV Bharat / state

अॅसिड हल्ला करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या गुड्डू यादवला दुहेरी फाशी, पालघर न्यायालयाचा निर्णय - पालघर न्यायालय

दोघांचा स्वतंत्र खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपी गुड्डू यादवला एकत्रित भोगायच्या आहेत.

पालघर न्यायालय
author img

By

Published : May 10, 2019, 1:34 PM IST

Updated : May 10, 2019, 1:58 PM IST

पालघर - बोईसर येथे अॅसिड हल्ला करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी गुड्डू यादव याला पालघर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी सुनावली आहे.

बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी गुड्डू यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुड्डू यादव याला ताब्यात घेतले. सरकारी वकील दीपक तरे यांनी तसेच पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे या आधारावर गुड्डू यादव याच्यावरील आरोप पालघर न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणी झालेल्या अंतिम सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी आरोपी गुड्डू यादव या गुन्ह्यात दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. दोघांचा स्वतंत्र खून केल्याप्रकरणी आरोपीला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपी गुड्डू यादव याला एकत्रित भोगायच्या आहेत.

मोबाईल चोरीच्या क्षुल्लक कारणातून केला खून-
बोईसर औद्योगिक क्षेत्रातील पॅरेडाइज् कंपनीमध्ये आरोपी गुड्डू यादव, राजकुमार रविदास व त्यांची पत्नी गीतादेवी हे तिघे काम करीत होते. यापैकी राजकुमार व त्यांची पत्नी आपल्या मुलांसह या कंपनीतच राहत होते. आरोपी गुड्डू याने नोव्हेंबर २०१५ मध्ये राजकुमार यांचा मोबाईल चोरला होता. याविषयी राजकुमार यांनी गुड्डू याला विचारणा केली. मात्र, त्यानंतर या दोघांमध्येही या प्रकरणावरून वादावादी झाली. या वादावादीनंतर राजकुमार यांनी ही घटना आपल्या मालकाला सांगितली. त्यावेळी मालकाने गुड्डू यादव याला बोलावून खडसावले. याचा मनात राग ठेवून आरोपीने राजकुमार यांचा वचपा काढण्याचे ठरवले.

खटल्याची माहिती देताना सरकारी वकील

झोपलेल्या पती-पत्नीच्या अंगावर टाकले होते अॅसिड-
गुड्डू याने कंपनीतील ज्वलनशील द्रव्य सल्फुर सल्फुरिक अॅसिडची बादली घेऊन कंपनीत झोपलेल्या राजकुमार व त्यांच्या पत्नीच्या अंगावर फेकले. ही घटना ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. त्यामुळे राजकुमार व त्यांच्या पत्नीला गंभीर इजा झाली. राजकुमार यांनी गुड्डूला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी तिथून फरार झाला. कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांनी दोघांनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, दोघेही ९८ टक्के भाजल्याने राजकुमार व त्यांची पत्नी गीता या दोघांचाही मृत्यू झाला.

Intro:बोईसर येथील ऍसिड हल्यातील आरोपीला पालघर सत्र न्यायालयाने सुनावली दोनदा फाशीची शिक्षा Body:बोईसर येथील ऍसिड हल्यातील आरोपीला पालघर सत्र न्यायालयाने सुनावली दोनदा फाशीची शिक्षा

नमित पाटील,
पालघर, दि.10/5/2019

बोईसर येथे एसिड अटॅक करून दोघांचा खून केलेला आरोपी गुड्डू यादव याला पालघर न्यायालयाने पती-पत्नीच्या खुन प्रकरणी दोषी ठरवून त्याला दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. पालघर सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी ही सजा सुनावली आहे.

बोईसर औद्योगिक क्षेत्रातील पॅरेडाइज् कंपनीमध्ये आरोपी गुड्डू यादव, राजकुमार रविदास व त्याची पत्नी गीतादेवी हे तिघे काम करीत होते. यापैकी राजकुमार व त्याची पत्नी आपल्या मुलांसह या कंपनीतच राहत होते. आरोपी गुड्डू याने नोव्हेंबर 2015 रोजी राजकुमार याचा मोबाईल चोरला होता मोबाईल चोरला प्रकरणी राजकुमार याने गुड्डू याला याविषयी विचारणा केली. मात्र त्यानंतर या दोघांमध्येही या प्रकरणावरून वादावादी झाली, या वादावादीनंतर राजकुमार यांनी ही घटना आपल्या मालकाला सांगितली त्यावेळी मालकाने गुड्डू यादव यास बोलावून त्याला खडसावले राजकुमार यांनी माझी तक्रार मालकाकडे केली व मालकाने मला खडसावले याचा राग मनात ठेवून गुड्डू याने त्याचा वचपा घेण्याचे ठरवले.

5 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान गुड्डू याने कंपनीतील ज्वलनशील द्रव्य सल्फुर सल्फुरिक ॲसिडची बादली घेऊन कंपनीत झोपलेल्या राजकुमार व त्याच्या पत्नीच्या अंगावर फेकले. त्यामुळे राजकुमार व त्याच्या पत्नीला गंभीर इजा झाली राजकुमार यांनी गुड्डू ला पकडण्याचा प्रयत्न केला असता गुड्डू तिथून फरार झाला. त्यानंतर राजकुमार यांनी आरडाओरडा केला व ते झोपलेल्या ठिकाणी त्याने दरवाजा उघडून त्या खोलीतून दोघेही बाहेर पडले अंगावर ॲसिड पडले हे लक्षात येताच राजकुमार यांचे सहकारी व कंपनीत काम करीत असलेले कामगार यांनी या दोघांनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र दोघेही 98 टक्के भाजल्याने उपचार सुरू असताना राजकुमार व त्याची पत्नी गीता या दोघांचाही मृत्यू झाला.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी गुड्डू यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गुड्डू यादव याला ताब्यात घेतले व त्यानंतर त्याच्या विरोधात पालघर न्यायालयात हे प्रकरणी सरकारी वकील दीपक तरे यांनी तसेच पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे या आधारावर गुड्डू यादव याने ऍसिड अटॅक करून दोघांचा खून केल्याचे सिद्ध झाले व न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. या प्रकरणी झालेल्या अंतिम च्या सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र माजगावकर यांनी आरोपी गुड्डू यादव या गुन्ह्यात दोषी म्हणून फाशीची शिक्षा सुनावली दोघांना दोघांचा स्वतंत्र खून केल्याप्रकरणी दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपी गुड्डू यादव यांना एकत्रित भोगायच्या आहेत.Conclusion:
Last Updated : May 10, 2019, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.