पालघर /नालासोपारा - येथील सेन्ट्रल पार्कमध्ये ५७ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. या रुग्णावर नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारादरम्यान सदर व्यक्तिचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सदर रुग्ण हा ताज हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. यामुळे वसईत आता मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1399 वर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 91 जणांचा मृत्यू झाला आहे.