ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात; एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी - mumbai ahmedabad highway accident palghar

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या विधी सेलच्या जिल्हाध्यक्षांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

car accident palghar  palghar accident news  पालघर अपघात न्युज  पालघर लेटेस्ट न्युज  मुंबई अहमदाबाद महामार्ग अपघात  mumbai ahmedabad highway accident palghar  palghar latest news
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात; एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
author img

By

Published : May 13, 2020, 2:57 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत कारचा भीषण अपघात झाला. मुंबईहून सुरतच्या दिशेने जात असताना ही घटना घडली असून अपघातात एकाचा मृत्यू झाला, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत व्यक्ती बहुजन विकास आघाडीचे विधी सेलचे जिल्हाध्यक्ष असून ते पेशाने वकील असल्याचे समजते.

संबंधित व्यक्ती मुंबईवरून कारने सुरतला जात होते. कार मुंबई-अहमदाबादवरील मेंढवन खिंडीत आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.