पालघर - वसईच्या कळंब ( Minor girl Murder Kalamb Lodge ) येथील एका लॉजमध्ये प्रियकराने अल्पवयीन तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वसईच्या कळंब येथील हार्दिक या लॉज मध्ये हा प्रकार घडला आहे. या हत्येनंतर तिच्या फरार झालेल्या प्रियकराने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक शहा (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - Waghoba Ghat Accident Palghar : वाघोबा घाटात ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात; दोन जणाचा जागीच मृत्यू
नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथे हर्षद फार्म हाऊस लॉज आहे. अभिषेक शहा (वय २१) हा तरुण त्याच्या १७ वर्षीय प्रेयसीसह या लॉजमध्ये आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला, मात्र परतलाच नाही. लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. पोलीस या फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत होते, मात्र त्यानेही ट्रेनखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मृत तरुणी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, तिला लॉजिंगमध्ये प्रवेश कसा दिला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, या घटनेवरून कळंब गावात लॉजिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Law College Principal Resign : विरारमधील लॉ कॉलेजच्या मुस्लीम प्राचार्य महिलेचा राजीनामा; हिजाब कनेक्शन?