पालघर - वसई तालुक्यात महावितरणाच्या पथकाने वीज चोरीचा पर्दाफाश केला आहे. वसईत वीज चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या रात्रीच्या वेळी वीज खांबावर आकडा टाकून वीज चोरी करतात. अनेक तक्रारीनंतर महावितरण पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नायगावच्या जूचंद्र, वाघराळपाडा, सोमेश्वर नगर या परिसरात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या पथकाद्वारे कारवाई
या वीज चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वीज चोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या पथकाद्वारे कारवाई करायला सुरुवात केली. 21 डिसेंबरला महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील वाघराळपाडा, सोमेश्वर नगरमध्ये धाड टाकली. त्यावेळी विनामीटर अनधिकृतरित्या वीज वापरत असल्याचे आढळून आले. त्यांनी चाळीत येणाऱ्या इनकमिंग वायरला टेपींग करून विनामीटर आपल्या घरातील विद्युत उपकरणांना जोडून महावितरणची वीज चोरी केली.
या 14 जणांवर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महावितरणातील सहाय्यक अभियंता सौरभ सुरेश भोवरे यांनी तक्रार देत आरोपी अमर गौतम घोल, झया रामसिंग चौहान, प्रदीप निगम, महेश गुप्ता, उस्मान मेहबूब आलम, मोहन मस्के, राजू सिंग, शेख बहादूर यादव, शिवानंद अशोक मदेसिया, राजेश सोनकर, राजाराम विश्वकर्मा, अमन श्रीकांत सोनी, शविता आनंद वर्मा आणि सना खातून मोहम्मद या 14 जणांवर वसई पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
या 14 वीज चोरणाऱ्या आरोपींनी 5 हजार 560 युनिटची वीज चोरी करून 85 हजार 690 रुपयांचे महावितरणचे नुकसान केले आहे.
हेही वाचा - '१७ वर्षीय पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्षात २८ वर्षांचे', आसिफचा खळबळजनक खुलासा