ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: पालघरच्या किनारपट्टीवर देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन

author img

By

Published : Jan 12, 2021, 4:26 PM IST

महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यांवर समृद्ध जैवविविधता आढळते. यात काही हंगामी पक्ष्यांचाही समावेश आहे. सध्या पालघरच्या समुद्रकिनारी परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.

पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनापट्टी भागात परदेशी पक्षांचे आगमन

पालघर- महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यांवर समृद्ध जैवविविधता आढळते. यात काही हंगामी पक्ष्यांचाही समावेश आहे. सध्या पालघरच्या समुद्रकिनारी परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.निसर्गात ऋतुनुसार सतत बदल होत असतात. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले वातावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्यासाठी दूर अंतरावरून स्थलांतर करत पक्षी येतात. वर्षांच्या एका विशिष्ट कालावधीत त्यांचे स्थलांतर होते. पक्षी अन्न आणि प्रजननासाठी वर्षाच्या वेगवेगळ्या हंगामात स्थलांतर करतात. पावसाळ्याची सांगता होत असताना व हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक परदेशी पक्ष्यांचे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आगमन होते. सध्या या भागात वाढवण, चिंचणी, तारापूर या भागात सध्या 'कलहंस' हे आकर्षक पक्षी स्थलांतरित झालेले पहायला मिळत आहेत. या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

कलहंस

या पक्षाला इंग्रजीत Greylag Goose असे म्हणतात. हा पक्षी मध्यम रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या मध्यम आकाराच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो. शेपटीकडील भाग करडा आणि चोच मांसल गुलाबी असा या पक्षाचा रंग आहे. हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतो. मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात कलहंस दुर्मिळ असून पुढे दक्षिणकडे सहसा आढळून येत नाही. नद्या, सरोवरे, धानाची शेती आणि गवती कुरणांच्या भागात हे पक्षी वास्तव्य करतात.

शांत ठिकाणी पक्षांचे वास्तव्य-
पालघर जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी म्हटली की सौंदर्याने नटलेली किनारपट्टी संबोधली जाते. या किनारपट्टी भागात अनेक ठिकाण ही सुशोभित किनारपट्टी, पिकनिक पॉईंट आणि पर्यटन स्थळांनी सजलेली किनारपट्टी आहे. काही ठिकाणी ही किनारपट्टी गजबजलेली असली तरीही काही ठिकाणे अशी आहेत की जी शांत आणि गर्द झाडाझुडपांनी विस्तारलेली आहे. त्यामुळे अशा भागात स्थलांतरित विविध जातीचे स्थलांतरित व दुर्मिळ पक्षी वास्तव्य व विहार करत असतात. सध्या पक्षांची रेलचेल या भागातील चिंचणी, वाढवण, तारापूर भागात पाहायला मिळत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.