ETV Bharat / state

Road Closed in Palghar:  जलवाहिनीच्या खोदकामासाठी हा रस्ता राहणार दोन आठवडे बंद - Road Closed in Palghar

मुंबई अहमदाबाद महामार्गालगत एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या खोदकामासाठी मनोर मस्तान नाका दोन आठवडे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार (Manor Mastan Naka road closed for traffic) आहे. मनोर पालघर रस्त्यावर महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलालगत खोदकाम केले जाणार असल्याने 19 सप्टेंबर पासून 04 ऑक्टोबर पर्यत मनोर पालघर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार (road closed for digging of water channel MMRDA ) आहे.

Manor Mastan Naka road
मनोर मस्तान नाका रोड
author img

By

Published : Sep 18, 2022, 1:07 PM IST

पालघर - मुंबई अहमदाबाद महामार्गालगत एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या खोदकामासाठी मनोर मस्तान नाका दोन आठवडे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार (Manor Mastan Naka road closed for traffic) आहे. मनोर पालघर रस्त्यावर महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलालगत खोदकाम केले जाणार असल्याने 19 सप्टेंबर पासून 04 ऑक्टोबर पर्यत मनोर पालघर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार (road closed for digging of water channel MMRDA ) आहे.

रस्ता बंद केला जाणार असल्याने रिक्षा चालक, प्रवासी आणि वाहनचालकांची गैरसोय होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून शनिवारी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे.

एमएमआरडीएमार्फत, सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या आरओडब्लूमध्ये खोदकाम करून जलवाहिनी टाकली जात आहे. मस्तान नाका उड्डाणपुलालगत मनोर पालघर रस्त्याखालून जलवाहिनी टाकली जाणार असल्याने रस्ता खोदकाम करावे लागणार आहे. त्यामुळे मस्तान नाक्याकडून मनोर-पालघरकडे येणारी वाहतूक बंद (Manor Mastan Naka road closed) करून पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी, एमएमआरडीए मार्फत करण्यात आली होती. 9 सप्टेंबरपासून 4 ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याची मागणी करण्यात आली होती.

एमएमआरडीएच्या मागणीनुसार पर्यायी वाहतूक मार्ग - एमएमआरडीएच्या मागणीनुसार पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून शनिवारी मनोर पालघर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सोमवार पासून दोन आठवड्यांपर्यंत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोरवरून मस्तान नाक्याकडे जाणारी तसेच मस्तान नाक्यावरून मनोर बाजूकडे येणारी वाहतूक दोन आठवड्यांच्या कालावधीतसाठी बंद करण्यात येणार (Manor Mastan Naka road in Palghar) आहे.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग -
■मनोरकडून मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाणारी अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
●मनोर हातनदी - नांदगाव मार्गे मुंबई - अहमदाबाद महामार्ग बाजूकडे
●मनोर राऊत वजनकाटा - महसूल भवन मार्गे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बाजूकडे
■मुंबई अहमदाबाद महामार्गकडून मनोर पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
●मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग - नांदगाव - हातनदी मार्गे- मनोर पालघरच्या दिशेने
●मुंबई अहमदाबाद महामार्ग महसूल भवन-सिमला हॉटेल-राऊत वजनकाटा मार्गे मनोर पालघरच्या दिशेने.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.