ETV Bharat / state

Support Uddhav Thackeray :शिवसैनिकांनी स्टॅम्प पेपरवर लिहले प्रतिज्ञापत्र; उद्धव ठाकरेंवर आमचा विश्वास - Shiv Sainiks of Palghar district

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना एका शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पालघर जिल्हा प्रमुखाच्या मार्फत लिहून दिले जात आहे. विक्रमगड विधानसभेचे ( Vikramgad Assembly ) संघटक प्रल्हाद कदम यांनी त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर माझी निष्ठा आहे. मी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ श्रद्धा व विश्वास आहे. त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा ( Unconditional support to Uddhav Thackeray ) आहे. माझी शिवसेना पक्षाच्या पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. प्रतिज्ञापत्र दिलेली माहिती असत्य निघाल्यास मी भा.द.वी दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र राहील. असे प्रतिज्ञापत्र पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक लिहून देत आहेत.

Shiv Sainiks
शिवसैनिकांनी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले
author img

By

Published : Jul 24, 2022, 9:21 PM IST

पालघर - शिवसेनेत बंड करून भाजपाच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आपला वेगळा गट तयार केल्यामुळे शिवसेनेतील अनेक आमदार व खासदार ,पदाधिकारी,हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील झाले आहेत. पालघर जिल्ह्या सुद्धा या बाबतीत मागे नाही. जिल्ह्यातील ‌ विद्यमान खासदार, आमदार, पंचायत समिती सभापती , उपसभापती, जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच, स्थानिक पदाधिकारी, असे झाडून पुसून मोठ्या संख्येने शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाल्यामुळे, पालघर जिल्ह्यात शिवसेना बॅगफुटवर आली असल्याचे चित्र आहे. यामुळे शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी अनेक पदाधिकारी हे शिवसेनेतू शिंदे गटात सामील होत आहेत. अशा संकट परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील ( Palghar District Shiv Sena ) काही निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासोबत असल्याचे चित्र दिसत आहे.

Shiv Sainiks of Palghar district
शिवसैनिकांनी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले

उद्धव ठाकरेना बिनशर्त पाठिंबा - आम्ही आपल्या सोबत असल्याचे एका शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पालघर जिल्हा प्रमुखाच्या मार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहून दिले जात आहे. विक्रमगड विधानसभेचे संघटक प्रल्हाद कदम या निष्ठावंत शिवसैनिकांनी एका शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आजही आपली वंदनीय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यावर निष्ठा असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले .त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वावर माझी निष्ठा आहे. मी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ श्रद्धा व विश्वास आहे. त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा ( Unconditional support to Uddhav Thackeray ) आहे. माझी शिवसेना पक्षाच्या पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. प्रतिज्ञापत्र दिलेली माहिती असत्य निघाल्यास मी भा.द.वी दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र राहील. असे प्रतिज्ञापत्र पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक लिहून देत आहेत.

हेही वाचा - Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार

शिवसैनिकांचे ठाकरेंना प्रतिज्ञापत्र - प्रतिज्ञापत्र 200 पेक्षा जास्त शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. यामध्ये मोखाडा पंचायत समिती सभापती आशा झुगरे, माजी सभापती तसेच विद्यमान प.स. सदस्य प्रदीप वाघ, सरपंच संजय वाघ अशा अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी आजही आपली निष्ठा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा आढळ विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत. असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. जे शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेले, त्यामुळे शिवसेनेवर कोणताही फरक पडणार नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने पालघर जिल्ह्यात शिवसेना उभी करणार आहोत. अशी माहिती शिवसैनिकांनी दिली आहे. यावरून पालघर जिल्ह्यात आजही काही निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Raju Vitakar : शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात सामील; 'त्या' रात्री नेमक काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.